बुधवार दि. 10 जुलै 2024 रोजी लोपमुद्रा हॉस्पिटल, पिरंगुट येथील डॉ. अर्चना साळवे, (MBBS, MS, Fellowship in Reproductive Medicine) यांनी 11 वीच्या विद्यार्थिनींना, ‘स्त्रियांचे आरोग्य’ या विषयी मार्गदर्शन केले. या प्रसंगी त्यांनी Adolescent Health, HPV vaccine, Menstrual Health या मुद्यांवर सविस्तर संवाद साधाला. त्यांच्याबरोबर डॉ. मयुरी वनारससे आणि नर्स अश्विनी पलासकर यादेखील उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन जेष्ठ शिक्षिका सौ. सावित्री पाटील यांनी प्राचार्या सौ. पूजा जोग यांच्या मार्गदर्शनाखाली केले. यावेळी श्रीमती प्रियांका हजारे, श्री. शिवदास कापूरे, श्री. मंगेश पाटील हे शिक्षक उपस्थित होते. कॅडेट श्रेया सुहास घेवारी आणि कॅडेट आर्या जितेंद्र कोरे यांनी आभार मानले.