आज रविवार दिनांक 2 फेब्रुवारी इ.8 वी च्या एकूण 80 कॅडेट ने सकाळी शिवगर्जना झाल्यानंतर सैनिकी शाळा ते पिरंगुट टेकडीवरील ऐतिहासिक शिवकालीन तुळजाभवानी मंदिरापर्यंत पायी जाऊन येऊन ट्रेक पूर्ण केला. मंदिर परिसरात असणाऱ्या लांब उडी, ट्रेनिंग रोप चा आनंद घेतला. आदिशक्ती मोफत पोलिस भरती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष पोलिस निरीक्षक श्री. संतोष जी भुमकर सर यांनी कॅडेटस ला मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. म. यज्ञरामन सर यांच्या मार्गदर्शनानुसार पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, मेट्रन भाग्यश्री ताई, लक्ष्मीताई, श्री. राम काका, श्री. जयेश दादा यांनी केले होते.