पुणे जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्चं माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष 2024 – 25 साठी पुणे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळामध्ये गुणवत्ता संवर्धन शाळा तपासणी अभियान राबविण्यात आले.
या अंतर्गत शालेय स्तर, तालुका स्तर व जिल्हा स्तर या तीन टप्प्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे.
हे अभियान शालेय विकासातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे .
गुणवत्ता संवर्धन अभियानाचा प्रमुख उद्देश शालेय निरीक्षण व पर्यवेक्षणा द्वारे पारंपरिक व आधुनिक बाबींचा शालेय शिक्षण वाटचालीत समावेश व्हावा या दृष्टीने वर्तमान व आधुनिक निरीक्षण, तपासणीच्या पद्धतीचा समावेश करणे तसेच गुणवत्तेचे संवर्धन करण्यासाठी क्षमता वृद्धिंगत करणे, उणिवा दूर करणे, शिक्षक व शाळेचे कार्य परिचित करून देणे, शाळा विकासासाठी आवश्यक घटकांचे पुनरावलोकन करून अद्ययावत राहणे, शाळातील उत्तम व नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आदानप्रदान करणे हा आहे.
सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी तालुकास्तरावरील शाळा तपासणी पथकाने भेट देऊन शाळातपासणी केली.
भूगाव केंद्रातील पथकात केंद्रप्रमुख मा. श्री. म्हाळस्कर, चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालय बावधन चे मुख्याध्यापक मा. श्री. भरत मारणे, पिरंगुट हायस्कुल चे मुख्याध्यापक श्री. गोवेकर, कार्यालयीन अधीक्षक मा. श्री. रमेश शेलार, माध्यमिक विद्यालय भूगाव येथील तज्ञ् शिक्षक श्री. सैद, महात्मा फुले विद्यालय लवळे येथील तज्ञ् शिक्षक श्री. विवेक देशमुख यांनी शाला तपासणी केली.
गुणवत्ता संवर्धन अभियानाशी संबंधित भौतिक सुविधा, प्रशासन विषयक, अध्ययन अध्यापन प्रक्रिया, मुख्याध्यापक कर्तव्ये, शालेय विभाग, गुणवत्ता संवर्धन व विशेष उपक्रम या 6 विभागा अंतर्गत पाहणी करून गुणदान केले व अभिप्राय नोंदवला.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका पूजा जोग यांचाही पथकात समावेश असून केंद्रातील अन्य शाळांची तपासणी त्यांनी केली.
प्रशालेचे कमांडंट एअर विंग कमांडर मा. श्री. यज्ञरमण, मुख्याध्यापिका. मा. श्रीमती पूजा जोग, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे व श्री. संदीप पवार, यांनी उपस्थितांचे स्वागत केले व गुणवत्ता संवर्धन अभियानातील विभागांबाबत विस्तृत माहिती दिली.
संगणक निदेशक सौ. अश्विनी मारणे यांनी तांत्रिक सहकार्य केले, लिपिक श्री. मनोज शिंदे यांनी कार्यालयीन व विज्ञान अध्यापिका सौ. मंजिरी पाटील यांनी विभागश: नियोजन केले.
सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर सहकारी व सैनिकी परिवाराचे सहकार्य लाभले.
एकूणच विचारातून विकासाकडे झेपावण्यासाठी गुणवत्ता संवर्धन अभियान निश्चितच महत्त्वपूर्ण आहे.