छंद वर्ग उपक्रम
दिनांक ३० जुलै २०२४ रोजी, म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत छंद वर्गात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते, संगीत शिकणाऱ्या कॅडेटस् समोर संगीत तज्ञ प्रणव गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली मिताली यार्डे यांचे शास्त्रीय गीत गायनाचे सादरीकरण झाले. सुमंगल टेंगसे यांनी तबल्याची प्रात्यक्षिके सादर केली तर मालू गांवकर यांनी हार्मोनियम प्रात्यक्षिके सादर केली.
सर्व कलाकारांनी आपापल्या कलेविषयी माहिती देऊन कॅडेटस् च्या सर्व शंकांचे समाधान केले.
सदर कार्यक्रमाचे संयोजन प्रशालेतील शिक्षक भाऊसाहेब मार्तंड यांनी केले होते.