२१ जून २०२४ – जागतिक योग दिन….
म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत आज २१ जून २०२४ रोजी जागतिक योग दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून सहजयोग समन्वयक श्रीमती नेहा नाडकर या उपस्थित होत्या, शाळेचे कमांडंट एअर विंग कमांडर यज्ञरामन सर, मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, श्री. संदीप पवार व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व एकूण ५८२ विद्यार्थिनी उपस्थित होत्या, जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सैनिकी परिवारातील सर्वांनीच विविध आसने व प्राणायामांची माहिती घेऊन प्रात्यक्षिके केली, या निमित्ताने योगासन खेळाडूंचा सत्कार करण्यात आला,
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांनी करून दिला, आभार क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर यांनी मानले, या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर, एन.सी.सी. ऑफिसर सौ. राजश्री गोफणे, क्रीडा प्रशिक्षक श्रीमती ऋतुजा कापसे, श्रीमती रागिणी गंगावणे व सैनिकी परिवारातील सदस्यांनी केले होते.