‘नागरी शिष्टाचार’ अंतर्गत वाहतूक नियमांचे पालन…

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेने शालेय वार्षिक सादरीकरण विषय ‘नागरी शिष्टाचार’ अंतर्गत वाहतूक नियमांचे पालन याविषयी जागरूकता निर्माण करणे. या उद्देशाने पुढील कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सोमवार दि. 20/1/2025 रोजी ‘राष्ट्रीय सुरक्षा महिना 1 जानेवारी ते 31 जानेवारी’ निमित्ताने पौड गाव येथे ‘रॅली आणि पथनाट्य’ यांचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी 8 वी क वर्गातील 25 कॅडेट, 9 वी ब मधील 20 कॅडेट आणि शिक्षक सकाळी 10.30 वाजता पौड येथे जाऊन रॅली काढली आणि घोषणा दिल्या. रस्त्याच्या कडेने ओळीने विद्यार्थिनी पौड पोलिस स्टेशन पर्यंत गेल्या. त्या ठिकाणी पथनाट्य सादर केले. या ठिकाणी पौड पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. संतोष गिरीगोसावी साहेब सहा. पोलिस उपनिरीक्षक भाग्यश्री जाधव मॅडम, ठाणे अंमलदार अनिता रवळेकर मॅडम, पोलिस हवालदार मनोज कदम साहेब यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करुन त्यांचे कौतुक केले. पोलीस स्टेशनची माहिती दिली. तसेच पोलिस कोठडी, शस्त्रे हे देखील दाखविले. परत येताना पुन्हा रॅलीने पौड बसस्थानकापर्यंत घोषणा देऊन बसस्थानकावर पथनाट्य सादर करण्यात आले.
या कार्यक्रमा साठी शाळेचे कमांडट ए.वि.एन. विंग कमांडर यज्ञरामन सर, प्राचार्या श्रीमती पूजा जोग मॅडम, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे सर व श्री. संदीप पवार सर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी समन्वयक सौ. सावित्री पाटील, सैन्य प्रशिक्षक सुभेदार श्री. नवनाथ पवार, श्री. अक्षय मांडगे, सौ. सुनिता शिंदे, सौ. दिपाली आंबेकर, सौ. स्वाती शेवडे, मेट्रन भाग्यश्री हांडे, श्री. राम माहित हे उपस्थित होते. सादरीकरण विभाग प्रमुख सौ. सावित्री पाटील यांनी कार्यक्रमाचा समन्वय साधला.

Scroll to Top
Skip to content