दि. 15 जानेवारी म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली, ता. मुळशी. येथे कुस्तीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू व भारताचे पहिले ऑलिंपिक वैयक्तिक कांस्यपदक विजेते खाशाबा जाधव, यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून कुस्तीची राष्ट्रीय खेळाडू पै. प्रतीक्षा सुतार या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात क्रीडा पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांनी खाशाबा जाधव यांचा जीवनपट उलगडून दाखवला. आपल्या मनोगतात कुमारी प्रतीक्षा सुतार हिने खेळाडूंसाठी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. आपण कुस्तीमध्ये देखील करिअर करू शकतो, त्यासाठी मात्र शिस्त व नियोजन आवश्यक असल्याचे आवर्जून सांगितले. या प्रसंगी सैन्यप्रशिक्षक श्री. गजानन माळी व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. स्नेहल चव्हाण यांनी केले. शाळेचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.