म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली येथे शनिवार दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.00 ते 8.00 या कालावधीत प्रशालेचे स्नेहसंमेलन व गुणगौरव समारंभ शाळेच्या क्रीडांगणावर उत्साहात साजरे झाले.
म. ए. सो. शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेचे महामात्र डॉ. श्री उमेश बिबवे, स्नेहसंमेलनाच्या प्रमुख पाहुण्या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी सिद्धी आडवणकर, फिल्म मेकर श्री. रश्मिन महागावकर तसेच प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म यज्ञरामन, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. पूजा जोग, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्या उपस्थितीत स्नेहसंमेलन पार पडले.
भारतीय संस्कृती व सभ्यता – विविधतेत एकता या विषयाला अनुसरून स्नेहसंमेलनात भारतातील विविध राज्य-प्रदेश व त्यांची संस्कृती, परंपरा यांचे दर्शन प्रशालेच्या विद्यार्थिनींनी संबंधित राज्यातील पारंपारिक सामूहिक तसेच एकल नृत्याद्वारे सादर केले.
सदर स्नेहसंमेलनाला प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म यज्ञरामन, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. पूजा जोग यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
प्रशालेच्या भव्य पटांगणावर रंगबेरंगी प्रकाशझोतात व विविध राज्यातील पारंपरिक पोशाख परिधान करून विद्यार्थिनींनी उत्कृष्टरित्या भारतीय संस्कृती, परंपरा व सभ्यतेचे प्रदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थिनींच्या सत्कार समारंभाद्वारे झाली. म. ए. सो. शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, शाळेचे महामात्र डॉ. श्री उमेश बिबवे, स्नेहसंमेलनाच्या प्रमुख पाहुण्या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी सिद्धी आडवणकर व श्री. रश्मिन महागावकर यांच्या हस्ते प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. वर्ष 2023-24 मधील प्रत्येक इयत्ता व तुकडीतील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थिनी, वर्ष 2023-24 मधील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम पाच विद्यार्थिनी व वर्ष 2024-25 मधील प्रत्येक इयत्ता व तुकडीतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी तसेच विविध संस्थेद्वारे दिले जाणारे विशेष प्रावीण्य, शिष्यवृत्ती बक्षीसे यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.