राष्ट्रीय विज्ञान दिन
प्रतिवर्षीप्रमाणे शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन संपन्न झाला.
विज्ञान दिनाचे औचित्य साधून संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात Science February हा उपक्रम राबविण्यात आला.
भारतीय ज्ञान परंपरेची ओळख करून देणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसन व दृढीकरण करण्याच्या उद्देशाने विज्ञान विभागातर्फे 1 फेब्रुवारी 2025 पासून हा उपक्रम राबविण्यात आला.
दररोजच्या परिपाठामध्ये विज्ञान सुविचार, विज्ञान कोडे, संशोधन कथा, भारतीय शास्त्रज्ञांची माहिती, विज्ञान संकल्पनेवर आधारित वर्गश: प्रश्न, आजचे मुलद्रव्य व संकल्पनेवर आधारित वैज्ञानिक कृती व प्रयोग करून दाखवण्यात आले. हा उपक्रम विज्ञान छंद मंडळातर्फे घेण्यात आला. इयत्ता सहावी ते अकरावीच्या विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाल्या. या उपक्रमाची सांगता म्हणून शुक्रवार 28 फेब्रुवारी 2025 रोजी प्रशालेतील सर्व विज्ञान शिक्षकांनी परिपाठ सादर केला. यामध्ये विज्ञान सुविचार, विज्ञान कथा, विज्ञान कोडी, विज्ञानाच्या कृती व प्रयोग विज्ञान शिक्षकांनी करून दाखवले.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून कुलश: सायन्स मॅरेथॉन आयोजित करण्यात आली. सायन्स मॅरेथॉनचे स्वरूप पुढीलप्रमाणे
Round 1- 8 Science Riddles
Round 2- Concept explaining
Round 3 -Visual round
Round 4-Hands on Activity
Round 5-Run Stick Run
Round 6-Puzzle
सायन्स मॅरेथॉन दुपारी 2.15 ते 4 या वेळेत संपन्न झाली. इयत्ता सहावी ते आठवीच्या अहिल्या, जिजामाता, लक्ष्मी व दुर्गावती अशा एकूण 12 विद्यार्थिनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या. यामध्ये दुर्गावती कुल विजेत्या ठरला. कार्यक्रमासाठी प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म. यज्ञरामन, प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती पूजा जोग व सर्व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व विज्ञान शिक्षक सौ. मंजिरी पाटील, सौ. सावित्री पाटील, श्री. प्रमोद झुरमुरे, सौ. वैशाली शिंदे, कु. प्रियांका हजारे, श्री. शिवदास कापुरे , श्री. मंगेश पाटील व सौ. आरती जोशी सर्व विज्ञान शिक्षकांनी विद्यार्थिनींना उत्तम असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन विज्ञान विभागातर्फे करण्यात आले.