शैक्षणिक वर्ष – २०२४ – २५ प्रथम पालक सभा

रविवार दिनांक १४ जुलै २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता ६ वी ते १२ वी च्या वर्गश : पालक सभा वर्गात झाल्या, पालक -शिक्षक संघ व माता -पालक संघ पहिली सभा शाळेच्या गोडबोले हाॅल मध्ये सरस्वती स्तवनाने झाली झाली . पालक शिक्षक संघाच्या शिक्षक सचिव सौ. सावित्री पाटील यांनी प्रास्ताविक करुन मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले यात इ. १० वी व इ. १२ वी चा निकाल सांगितला, जून व जुलै महिन्यातील कार्यक्रमांची माहिती तसेच वर्षभर होणा-या उपक्रमांची ही माहिती सांगितली, यानंतर नवीन निवड झालेल्या पालक – शिक्षक संघ व माता – पालक प्रतिनिधींची ओळख करून देण्यात आली, प्रशालेतील शिक्षक व कॅडेट यांची विविध पदे यांची माहिती सांगण्यात आली, यानंतर शाळेचे मेडिकल ऑफिसर सचिन नगरकर सर यांनी सर्वांना मार्गदर्शन करताना शाळेची मेडिकल पाॅलिसी याबद्दल माहिती सांगितली, डॉ. सचिन नगरकर सरांचा परिचय प्राचार्या श्रीमती पूजा जोग मॅडम यांनी करून दिला, पालक प्रतिनिधींनी विचारलेल्या शंकांचे समाधान शाळेचे कमांडंट एअर विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन सर, प्राचार्या श्रीमती पूजा जोग यांनी केले, पुढील पालक भेट १५ ऑगस्ट रोजी होणार आहे असे सांगण्यात आले सर्वांचे आभार सचिव सौ. सावित्री पाटील यांनी मानले त्यानंतर सभा संपन्न झाली.

 

Scroll to Top
Skip to content