दि. १० जानेवारी २०२४ रोजी म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथे रोटरी क्लब ऑफ पूना वेस्ट , रोटरी इंटरनॅशनल जिल्हा 3131 व व्हलकन टेक्नॉलॉजीज यांच्या सामाजिक बांधिलकी च्या वतीने सैनिकी शाळेला ला ४ स्मार्ट टीव्ही , २ यु.व्ही प्लांट्स आणि ५ ओपन जिम चे साहित्य देण्यात आले याचा उद्घाटन समारंभ व्हल्कन टेक्नॉलॉजी चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री राजेश जी मिश्रा तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा व शाळा समिती अध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, श्री. अमोल गावडे ,श्री. रवींद्र घेवडे ,श्री. कल्पेश गुप्ता, रोटरी क्लब ऑफ पूना वेस्ट चे अध्यक्ष श्री. विपिन घाटे, श्री. निरंजन मथुरे, श्री. संतोष चिपळूणकर, श्री. पवनदीप सिंग, श्री. हरेंद्र देशपांडे, श्री. प्रशांत अक्कलकोटकर, सौ. माधुरी घाटे, सौ. दिपाली मथुरे, सौ. दिपाली देशपांडे, माजी मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडला, आपल्या अतिथी मनोगतात श्री. राजेश मिश्रा यांनी जी शाळा देशकार्यात प्रत्यक्ष सहभागी आहे अशा शाळेला भविष्यात नक्कीच मदत करू असे आश्वासन दिले, तर अध्यक्षीय भाषणात सौ. आनंदी पाटील यांनी मुलींना भविष्यात देशसेवेच्या खूप संधी असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले होते.