दरवर्षीप्रमाणे शाळेमध्ये शिवजयंती उत्सव अत्यंत उत्साहामध्ये पार पडला. या उत्सवाचे नियोजन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी केले होते. कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा, पोवाडा, गोंधळी गीत, नाट्यप्रसंग सादर करण्यात आले. शिवचरित्राचे गाढे अभ्यासक तथा शिव व्याख्याते मा. श्री विजय खुटवड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडून दाखवला. या कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता नववीने केले होते. या कार्यक्रमासाठी शाळेचे कमांडंट श्री यज्ञ रमण सर, मा. मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सर्व सैनिकी परिवार उपस्थित होता. या प्रसंगी ब्रह्मांड संस्थान सामाजिक राष्ट्रसेवा, पुणे या संस्थेचे सदस्य मा. चारुहास रेडकर (निवृत्त BSNL class one officer) यांनी शिवरायांचे मावळे यांच्या ९ प्रतिमा तसेच ५५० जीवन ज्ञान पुस्तिका प्रदान केल्या. तसेच शिव व्याख्याते श्री विजय खुटवड यांचे व्याख्यान आयोजित केले. छत्रपती शिवरायांच्या आरती व प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.