राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली प्रशालेत गणित दिन उत्साहात साजरा झाला.
शुक्रवार दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली येथे प्रशालेचा वार्षिक गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. थोर गणित तज्ञ श्री दत्तात्रेय कापरेकर सर यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेत गणित दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात गणित तज्ञ श्री दत्तात्रेय कापरेकर सर यांच्या जीवनकार्याचा व गणितातील त्यांचे योगदान याबाबत माहिती सादर करण्यात आली. तसेच गणित दिनाचे औचित्य साधून गणित प्रश्न मंजूषा घेण्यात आली. सदर प्रश्न मंजूषा स्पर्धा ही कुलशः घेण्यात आली. प्रशालेच्या प्रत्येक कुलातील इयत्ता सहावी, सातवी व आठवीतील प्रत्येकी एक विद्यार्थिनी याप्रमाणे चार कुलांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती स्तवन व थोर भारतीय गणित तज्ञ श्री रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून करून करण्यात आली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व संचालन इयत्ता नववी च्या विद्यार्थिनींनी केले होते.
शिक्षकांसाठी गणितातील मनोरंजक कोडी विचारण्याात आली ज्यामुळे कार्यक्रमात अधिक रंगत आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे कमांडंट विंग कमांडर श्री यज्ञरामन सर, शालेय पदाधिकारी श्री श्याम नांगरे सर व श्री संदिप पवार सर यांच्या हस्ते गणित प्रश्न मंजूषा स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थिनींचा गणिताची पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. प्रशालेचे कमांडंट विंग कमांडर श्री यज्ञरामन सर यांनी याप्रसंगी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले व सर्व स्पर्धक विद्यार्थिनींचे कौतुक केले. शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ पूजा जोग मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गणित दिन राबवण्यात आला. प्रशालेचा गणित दिन यशस्वी होण्यासाठी शाळेतील गणित शिक्षक श्री रविन्द्र उराडे, सौ रेखा रायपुरकर, सौ वैशाली शिंदे, श्री सचिन जाधव, श्री मंगेश पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.