आज दि. 8/7/2024 रोजी म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेचा 27 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. म.ए.सो. संस्थापक प्रतिमापूजन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांनी केले, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे यांनी शाळेचा इतिहास उलगडून दाखविला, शाळेचे कमांडंट विंग कमांडर श्री. यज्ञरामन सर, प्राचार्या श्रीमती पूजा जोग मॅडम यांनी सर्वांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थिनींची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली तसेच कुल प्रमुख व उपप्रमुख म्हणून शिक्षक व विद्यार्थिनी प्रतिनिधींची निवड करण्यात आली. आभार श्री. सचिन जाधव सर यांनी मानले.