सैनिकी शाळेत आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन……

आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन…

 

आज शुक्रवार दिनांक 19 जुलै रोजी म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते, इयत्ता 6 वी च्या वर्गातील कॅडेटनी विठ्ठल, रखुमाई व वारकरी यांची वेशभूषा करून टाळ मृदंगाच्या गजरात सैनिकी शाळेचे वस्तीगृह ते शाळा दिंडी काढण्यात आली होती. याप्रसंगी छंद वर्ग प्रशिक्षक कु. स्वराली चौधरी हिने भरतनाट्यम नृत्याचे सादरीकरण केले, ज्येष्ठ शिक्षक श्री. अद्वैत जगधने यांनी आषाढी वारीचे महत्त्व सांगितले, मा. प्राचार्या श्रीमती पूजा जोग यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने घेतलेल्या अभंग गायन स्पर्धेचा निकाल जाहीर केला, याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री. अजय चौधरी, सौ. अनुराधा चौधरी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, श्री. संदीप पवार व सर्व सैनिकी परिवार उपस्थित होता या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे कमांडंट एअर विंग कमांडर श्री. यज्ञरामन सर व प्राचार्या श्रीमती पूजा जोग यांच्या मार्गदर्शनानुसार इ.6 वी चे वर्गशिक्षक सौ. वैशाली शिंदे, श्री. रविराज थोरात व सर्व सैनिकी परिवाराने केले होते.

Scroll to Top
Skip to content