सैनिकी शाळेत भारतीय नौदल दिवस उत्साहात साजरा…

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, पुणे येथे भारतीय नौदल दिवस उत्साहात साजरा
बुधवार ४ डिसेंबर २०२४ रोजी प्रशालेतील एअर एन सी सी आणि प्रशालेच्या कॅडेट्सकडून भारतीय नौदल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ६:०० वा. एन सी सी आणि प्रशालेच्या सर्व कॅडेटसनी मानवंदना देऊन उत्तम संचलन केले. तसेच सायंकाळी ४:०० वाजता सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात सूत्रसंचालक कॅडेट चिन्मयी संदीप देसले आणि कॅडेट समिक्षा विठ्ठल जाधव यांनी भारतीय नौदलाची माहिती व इतिहास सांगितला. त्याचबरोबर भारतीय नौदलाचा प्रोत्साहनात्मक व्हिडीओ दाखवण्यात आले. कॅडेट नेहा प्रविण पाष्टे हिने सर्वांचे आभार मानले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेतील एन सी सी कॅडेट्सनी केली. एन सी सी विभाग प्रमुख थर्ड ऑफिसर राजश्री गोफणे यांनी कॅडेट्सना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास शाळेचे सर्व पदाधिकारी, सैन्य प्रशिक्षण विभाग, क्रीडा विभाग ,वसतीगृह विभाग, व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Scroll to Top
Skip to content