आज म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. सकाळी 5.30 वाजता शालेय सभागृहात इ.6 वी ते 9 वी व 11 वी घ्या एकूण 398 कॅडेटसनी प्रत्येकी 13 या प्रमाणे एकूण 5174 सूर्यनमस्कार घातले तर सकाळी 7.30 वाजता शालेय राजपथावर इ.6 वी ते इ.12 वी च्या एकूण 532 कॅडेटसनी प्रत्येकी 13 या प्रमाणे एकूण 6916 व 34 शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी 352 सूर्यनमस्कार घातले. एकूण सूर्यनमस्कार संख्या 12,442 झाली. इ.9 वी ची कॅडेट अनया कदम हिने रथसप्तमी व सूर्यनमस्काराचे महत्व समजावून सांगितले. मा. प्राचार्या पूजा जोग यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म. यज्ञरामन सर यांच्या मार्गदर्शनानुसार पर्यवेक्षक संदीप पवार, योग प्रशिक्षिका प्रिती वाळके, ए.एन.ओ. राजश्री गोफणे, क्रीडा शिक्षक महादेव मगर, सैन्य प्रशिक्षक अक्षय मांडगे व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले होते.