**शिवजयंती उत्सव**
19 Feb 24 (Mon)
प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी सोमवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी म ए सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ९.०० वाजता राणी लक्ष्मीबाई पुतळ्यापासून ढोल ताशांचा गजरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. लेझिम पथक, ढोल पथक विविध प्रकारच्या रचना करत संपूर्ण मिरवणूक वसतिगृहातील मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचली. शिवरायांच्या पुतळ्याचे वसतिगृह दारावर औक्षण करण्यात आले. व्यासपीठावर प्रशालेचे कमांडंट मा. श्री. एम यज्ञरमण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुतळ्यास हार घालण्यात आला. इयत्ता ९ वी तील मुलींनी या कार्यक्रमात पोवाडे गायन, शिव प्रसंगानुरूप नृत्य, नाटिका, शिवचरित्र व्याख्यान असे अनेक कार्यक्रम सादर केले व उपस्थितांची मने जिंकली. मुलींनी शिवरायांच्या जीवनावरील माहिती फलक झाडांना लावले होते. श्री. मार्तंडसरांनी “रणी फडकती लाखो झेंडे” पोवाडा सादर केला. उपमुख्याध्यापक श्री अनंत कुलकर्णी यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्वांनी शिवरायांची आरती गायली. कार्यक्रमाची सांगता शिवगर्जनेने झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता ९ वीच्या वर्गाने केले होते. या कार्यक्रमाला इतिहास विभाग प्रमुख श्री नांगरे सर यांचे मार्गदर्शन लाभले होते.
19 Feb 24 (Mon)
Shivajayanti Utsav Celebrations at RLMSS
~ As an annual event, this year on 19 Feb 24 (Mon),
Shivajayanti was celebrated with great enthusiasm and fevour at MES’s Rani Laxmibai Girls Military Academy.
~ At 0900 hrs, a procession of Chatrapati Shivaji Maharaj’s was held from the statue of Rani Laxmibai with the traditional drumming and dancing by the Cadets.
~ The procession after reaching the main venue of the hostel lawns, positioned Shivaraya’s bust at the pedestal and image was duly invoked by traditional lamp lighting and garlanding.
~ Cadets of class IX undertook the responsibility of planning and organising the celebrations in the most befitting and desirable manner who also presented an array of programs like powada, dance, drama, shivacharitra recital and won the hearts of the audience.
~ Mr Bhausaheb Martand, Teacher, RLMSS presented “Rani Phadkati Lakho Zende” Powada while the Vice Principal & PRP Mr Anant Kulkarni expressed his happiness and congratulations to the Cadet organisers.
~ All the Cadets and officials recited the aarti of Shivaraya and the celebrations culminated with the forceful recital of traditional Shivagarjana
~ The program was befittingly guided and coordinated by the Head of History Department Mr Shyam Nangare.
.
.
.
.