सैनिकी शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा……..

सैनिकी शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा…

आज 15 ऑगस्ट 2024 म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली ता. मुळशी येथे भारताचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण समारंभ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी च्या उपाध्यक्षा व सैनिकी शाळा शाला समिती अध्यक्षा आनंदीताई पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला. परेड कमांडर स्कूल कॅप्टन प्रार्थी म्हात्रे हिच्या नेतृत्वाखाली सर्व कॅडेटस नी बॅंडच्या तालावर शानदार संचलन करीत ध्वजाला सलामी दिली. याप्रसंगी विद्यार्थिनी प्रतिनिधी रॅंक पदवीदान सोहळा पार पडला. आपल्या मनोगतात आनंदी ताई पाटील यांनी सांगितले की भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे क्रांतिकारक यांचे स्मरण करीत आपण सर्वांनी भारतीय सशस्त्र सेनेमध्ये आपले योगदान देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगितले. कार्यक्रमाला शाला समिती महामात्रा चित्रा नगरकर, शाळेचे कमांडंट विंग कमांडर एम. यज्ञरामन, मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग, पर्यवेक्षक श्याम नांगरे, पर्यवेक्षक संदीप पवार, एन.सी.सी. अधिकारी ए. एन ओ. राजश्री गोफणे, सर्व शिक्षक, पालक प्रतिनिधी, सर्व सैनिकी परिवार व पालक उपस्थित होते.

15 Aug 24 function at RLMSS….through Drone Camera…

Goodwill efforts and sponsored by Adv Shri Hemant ji Chavan, Pune our dear Parent Volunteer….

Thanks from the MES’s RLMSS Family….

🙏

Scroll to Top
Skip to content