म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कर्नल विजयकुमार (निवृत्त) यांच्या हस्ते भारतमाता पूजन व ध्वजारोहण झाले. याप्रसंगी शाला समितीच्या महामात्रा प्रा. चित्रा नगरकर, म.ए.सो. सिनियर काॅलेज च्या प्रा. पूनम रावत, समुपदेशक वैशाली बोबडे, रोटरी क्लब पुणे विजडम चे नीलेश धोपटे, पालक प्रतिनिधी अपर्णा धर्माधिकारी, शाळेचे कमांडंट ए.वि.एन. विंग कमांडर एम. यज्ञरामन, शाळेच्या प्राचार्या पूजा जोग, पर्यवेक्षक शाम नांगरे व संदीप पवार हे उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर इयत्ता 6 वी ते 12 वी च्या सर्व कॅडेट्सने शानदार संचलन करीत अश्वांसहित ध्वजाला व प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. महाराष्ट्र गीत, झंडा गीत व प्रतिज्ञा झाल्यानंतर साहसी सैनिकी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. सायलेंट ड्रील, बँड, लेझीम, कराटे, मर्दानी खेळ, धनुर्विद्या, रायफल शूटिंग, योगासन, मल्लखांब आणि घोडेस्वारी अशा चित्त थरारक प्रात्यक्षिकांचे उत्कृष्ट सादरीकरण या ठिकाणी करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कर्नल विजयकुमार यांनी हा देश तुमच्यासारख्या सैनिकी शाळेच्या मुलींच्या हाती सुरक्षित आहे असे सांगत कौतुक केले आणि भविष्यामध्ये महिलांना देखील अनेक क्षेत्रात यशस्वी होण्याची संधी आहे असे आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे कमांडंट विंग कमांडर ए.वि.एन. एम यज्ञरामन, शाळेच्या प्राचार्या पूजा जोग यांच्या मार्गदर्शनानुसार पर्यवेक्षक संदीप पवार, क्रीडाशिक्षक महादेव मगर, ए.एन.ओ. राजश्री गोफणे, सुभेदार नवनाथ पवार, हवालदार गजानन माळी, सैन्य प्रशिक्षक अक्षय मांडगे, सर्व क्रीडा प्रशिक्षक व सर्व सैनिकी परिवाराने केले होते. याप्रसंगी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या एअर विंग एन.सी.सी. च्या
1) सार्जंट राधिका हेमंत चव्हाण – Best Cadet,
2) विधी वसंत वर्पे – Best in Turnout,
3) कॅडेट अनया अनिकेत कदम – Best in Drill
यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते ट्राॅफी देऊन सत्कार करण्यात आला.