स्कूल संसद 2024, हिवाळी अधिवेशनामध्ये पंतप्रधान मुलींच्या सैनिकी शाळेतील….

दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट पुणे आयोजित स्कूल संसद 2024 हिवाळी अधिवेशनामध्ये राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतील कॅडेट गिरीजा जोगळेकर कॅडेट मुक्ती पटेल व कॅडेट श्रिशा देशमुख या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
इंडियन रिपब्लिक पार्टी तर्फे पंतप्रधान म्हणून अभिभाषण करताना गिरीजा ने ‘अति लोकप्रियतेचा भारतीय खेळाडूंवर येणारा दबाव‘ हा विषय अतिशय योग्यपणे मांडला व त्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या १४७ खासदारांमधून निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असणारा 18 मतांचा सपोर्ट पूर्ण केला.
एकूण तीन दिवस चाललेल्या या अधिवेशनामध्ये तिसऱ्या दिवशी संसदेच्या पंतप्रधान पदासाठी इच्छुक असणाऱ्या सात उमेदवारांना उपस्थित 147 खासदारांनी मतदान केले. पंतप्रधानांना स्वतःचे मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर गाठून निवडून येणे आवश्यक होते.
त्यामध्ये कॅडेट गिरीजा जोगळेकर हिने ७९ मते मिळवून दणदणीत विजय प्राप्त केला, तसेच हा स्कूल संसद च्या इतिहासातील एक विक्रमी विजय ठरला. यानंतर स्वतःचे मंत्रिमंडळ स्थापन करत गिरीजा ने स्कूल संसद 2024 ची भारत देशाची पंतप्रधान म्हणून केलेले भाषण हे देशाच्या सर्वांगीण प्रगतीचे द्योतक असणारे भाषण होते यामुळे उपस्थित सर्वांनी तिचे कौतुक केले तसेच यावर्षीची पंतप्रधान म्हणून तिला स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
या सर्व मुलींना प्रशालेतील शिक्षकांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे प्रमुख श्री प्रशांत जोशी सर होते. प्रशालेचे कमांडंट श्री एम. यज्ञरमन सर, मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग, उपमुख्याध्यापक श्री अनंत कुलकर्णी सर, पर्यवेक्षक श्री शाम नागरे सर व श्री संदीप पवार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Election to Skool Sansad – 2024 (Maharashtra)

~ Cdt Girija Joglekar, Cdt Mukti Patel and Cadet Srisha Deshmukh all from Class IX of MES’s RLMSS participated in the Skool Sansad 2024 Winter Session organized by Deepstambh Charitable Trust, Pune.

~ Cdt Girija as the Prime Ministerial Candidate of
Indian Republic Party, very aptly raised the topic of ‘Pressure on Indian Sports personnel due to extreme popularity issues’ and on that basis She secured the support of 18 support slips required for contesting the election from the 147 MPs from all over Maharashtra.

~ These sessions lasted for three days. On the third day of the session (04 Feb 24), a total of 147 MPs voted for seven Candidates for the post of Prime Minister of Indian Skools Parliament.
The Prime Minister had to reach the magic figure and be elected to form his / her own cabinet.

~ Cdt Girija Hemant Joglekar of RLMSS secured a resounding victory by securing 79 votes, a record victory in the history of the Skool Sansad and first ever such achievement in the history of RLMSS.

~ After forming her own cabinet, Cdt Girija’s speech as the Prime Minister of India at Skool Sansad 2024, listed the provisions and aimed at the overall progress of the country. She was honored with a memento and certificate as the Prime Minister of this year.

~ All these Cadets of RLMSS were regularly guided by the Officials and Teachers of the school. This initiative was headed by Mr. Prashant Joshi, whose innovative ideas and regular training of the Cadets brought in this laudable and memorable achievement for us.

~ The MES’s RLMSS Family.