दिनांक – २६ फेब्रुवारी २०२४
स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त म ए सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस हार घालून मान्यवरांनी पूजन केले. प्रशालेतील शिक्षक प्रशांत जोशी सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. सालाबाद प्रमाणे इयत्ता ८ वी तील कॅडेटसने कार्यक्रमाची संपूर्ण तयारी केली होती. “जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे” या सावरकर लिखित गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. या प्रसंगी कॅडेटस सावरकरांच्या आठवणी जागवल्या. सावरकरांवरील प्रश्नमंजुषा कार्यक्रमाने रंगत भरली. श्रीमती मालतीताई आठवले यांजकडून इयत्ता ८ वी तून प्रथम व द्वितीय क्रमांक आलेल्या १) कॅडेट मुक्ती ईश्वर पटेल २) कॅडेट आर्या अश्विनी बंगाळ या विद्यार्थिनींना रोख रक्कम व स्वा. सावरकर ग्रंथ भेट देण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप प्रशालेतील पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे सर यांना केला. या कार्यक्रमाला प्रशालेचे कमांडंट एअर विंग कमांडर श्री. एम यज्ञरमण, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग, पर्यवेक्षक श्री संदीप पवार, प्रशालेचा शिक्षक वृंद व मोठ्या संख्येने कॅडेटस उपस्थित होत्या.