२७ फेब्रुवारी २०२४ – मराठी राजभाषा गौरव दिन…. साजरा….

२७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिनानिमित्त कार्यक्रम (मंगळवार दिनांक:- २७ फेब्रुवारी २०२४)
विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाला वाव मिळावा. या दृष्टीकोनातून प्रशालेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
वाचन स्पर्धा – बुधवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२४
वाचन हे ज्ञानार्जनाचे एक साधन आहे. तसेच वाचन ही जीवनभर पुरणारी शिदोरी आहे. या उद्देशाने प्रशालेत वाचन स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा इयत्ता सहावी ते नववी विद्यार्थिनींसाठी होती.
प्रशालेत मराठी राजभाषा दिनानिमित्त शुक्रवार दि. २२ फेब्रुवारी २०२४ रोजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थिनींचा उत्तम प्रतिसाद होता. ही स्पर्धा इयत्ता सहावी ते नववी विद्यार्थिनींसाठी आयोजित केली होती.
सुंदर हस्ताक्षर स्पर्धा– बुधवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२४
सुंदर अक्षर हाच खरा दागिना’ या नुसार विद्यार्थिनींना सुंदर अक्षर काढण्याची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने तसेच मराठी राजभाषा दिनानिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा इयत्ता सहावी ते नववी विद्यार्थिनींसाठी होती. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात वाचन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धा घेण्यासाठी प्रशालेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते. मराठी विभागातील शिक्षकांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
वाचन स्पर्धा
इयत्ता सहावी
१) प्रथम क्रमांक:- कॅ. अपूर्वा देशपांडे इ.६ वी ब
२) द्वितीय क्रमांक:- कॅ. गाथा सोनावणे इ. ६ वी
३) तृतीय क़मांक- कॅ.सिया भंडारी इ. ६वी
४) उत्तेजनार्थ – कॅ.सान्वी बढेकर इ. ६वी
इयत्ता सातवी
१) प्रथम क्रमांक:- कॅ. वेदिका शेळके इ. ७ वी ब
२) द्वितीय क्रमांक:- कॅ. अवनी कानविंदे इ. ७ वी अ
३) तृतीय क़मांक- कॅ. शिवांजली ढगे. इ.७ वी बW
४) उत्तेजनार्थ – कॅ. रचना जाधव ७ वी ब
इयत्ता आठवी
१) प्रथम क्रमांक:- कॅ. साक्षी पंडा इ.८ वी ब
२) द्वितीय क्रमांक:- कॅ. पूर्वा भापकर इ. ८वी अ
३) तृतीय क़मांक- कॅ. यशश्री पाडवे इ.८वी अ
४) उत्तेजनार्थ – कॅ. श्रुतिका पानमंद इ.८ वी ब
इयत्ता नववी
१) प्रथम क्रमांक:- कॅ. गिरिजा जोगळेकर इ. ९ वी ब
२) द्वितीय क्रमांक:- कॅ.साक्षी बोंडगे इ.९ वी अ
३) तृतीय क़मांक- कॅ. समृद्धी तौर इ.९ वी ब
४) उत्तेजनार्थ – कॅ. आर्या माने इ.९ वी अ
हस्ताक्षर स्पर्धा
इयत्ता सहावी
१) प्रथम क्रमांक:- कॅ. सान्वी बढेकर इ. ६वी
२) द्वितीय क्रमांक:- कॅ. अनघा राऊत इ.६ वी अ
३) तृतीय क़मांक- कॅ. अनुष्का बेंडाळे इ. ६ वी ब
४) उत्तेजनार्थ – कॅ. राजनंदिनी चौधरी इ.६ वी अ
इयत्ता सातवी
१) प्रथम क्रमांक:- कॅ. कस्तुरी गणगे वेदिका इ. ७ वी ब
२) द्वितीय क्रमांक:- कॅ.ज्ञानेश्वरी शिंदे इ. ७ वी अ
३) तृतीय क़मांक- कॅ. सायली पवार इ.७ वी ब
४) उत्तेजनार्थ – कॅ. नंदिनी धस इ. ७ वी ब
इयत्ता आठवी
१) प्रथम क्रमांक:- कॅ. मनस्वी खंदारे इ.८ वी ब
२) द्वितीय क्रमांक:- कॅ. स्वरा गवस इ. ८वी अ
३) तृतीय क़मांक- कॅ. समृद्धी पाटकुलकर इ.८वी ब
४) उत्तेजनार्थ – कॅ. तन्वी शनवारे इ.८ वी अ
इयत्ता नववी
१) प्रथम क्रमांक:- कॅ. आर्या बंगाळ इ. ९ वी अ
२) द्वितीय क्रमांक:- कॅ. श्रावणी नलावडे इ.९ वी ब
३) तृतीय क़मांक- कॅ. मुक्ती पटेल इ.९ वी ब
४) उत्तेजनार्थ – कॅ. रोहिणी गुरव इ.९ वी अ
वक्तृत्व स्पर्धा
इ.६ वी इ.७ वी
१) प्रथम क्रमांक:- कॅ. दक्षा कातोरे इ. ६ वी ब
२) द्वितीय क्रमांक:- कॅ. देविका ताड इ.७ वी अ
इ. ८ वी इ. ९ वी
१) प्रथम क्रमांक:- कॅ. पूर्वा भापकर इ. ८ वी अ
२) द्वितीय क्रमांक:- कॅ. स्वरा कोळी इ.९वी अ

मंगळवार दि.२७ फेब्रुवारी २०२४ मराठी राजभाषा दिनानिमित्त कार्यक्रम
थोर साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली पुणे येथे प्रशालेच्या पटांगणात उत्साहात सकाळी ७.४० ते ९.०० या वेळेत हा दिन साजरा करण्यात आला. सदरच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेचे मा. ऐविएन विंग कमाण्डर म. यज्ञरामन सर, प्राचार्या जोग मॅडम उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी सर, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे सर, श्री. पवार सर कार्यक्रमास उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी प्रतिमापूजन केले. सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेची कॅ. अवनी गरुड हिने सरस्वती वंदनेने सुरुवात केली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक इयत्ता नववी ब मधील कॅ. मुक्ती पटेल या विद्यार्थिनीने केले. इ. ८ वी अ मधील पूर्वा भापकर, इयत्ता ९ वी अ मधील स्वरा कोळी या विद्यार्थिनींनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली. इयत्ता ७ वी अ मधील देविका ताड या विद्यार्थिनीने ‘माझी मायबोली’ या विषयावर स्वतःचे मत व्यक्त केले. इ. ९ वी अ मधील साक्षी बोंडगे हिने कुसुमाग्रज यांच्या ‘कणा’ कवितेचे काव्यगायन केले. तसेच इयत्ता ६ वी अ मधील विद्यार्थिनींनी ‘या काळाच्या भाळावरती’ ही कृतियुक्त कविता सादर केली. इ. ९ वी अ व ब मधील विद्यार्थिनींनी ‘गावाशी बांधली नाळ ‘हे नाटक सादर केले. सदर नाटकाचे लेखन कॅ. आर्या माने हिने केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅ. समृद्धी तौर इ. ९ वी ब व कॅ. भाविका अहिरे इ. ९ वी अ या विद्यार्थिनींनी केले. आभार प्रदर्शन कॅ. श्रुती लहाने इ. ९ ब हिने केले.
प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती जोग मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थिनींना वाचनाचे मह्त्त्व, आपल्या मातृभाषेला किती मह्त्त्व आहे. हे अनेक उदाहरणातून पटवून दिले. कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने झाली. प्रशालेचे मा. ऐविएन विंग कमाण्डर म. यज्ञरामन सर, प्राचार्या श्रीमती जोग मॅडम, उपप्राचार्य श्री. कुलकर्णी सर, पर्यवेक्षक श्री. नांगरे सर , श्री. पवार सर या सर्व पदाधिकाऱ्यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभत असते. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन मराठी विभागाने केले होते.
मराठी राजभाषा आमची
महाराष्ट्राची शान !
भजन कीर्तन ऐकताना,
हरपते भान.

प्रतिवर्षीप्रमाणे ‘मराठी राजभाषा गौरव दिन या वर्षीही उत्साहात साजरा केला.
बालशिक्षण इंग्लिश मिडियम स्कूल पुणे यांच्यातर्फे
मराठी राजभाषा दिनानिमित्त झालेल्या आंतरशालेय स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे
काव्यलेखन स्पर्धा
१.कॅ. रचना जाधव – प्रथम क्रमांक इ.७ वी ब
२. कॅ. यशश्री दणाणे – द्वितीय क्रमांक इ.७ वी ब
निबंध स्पर्धा ( लहान गट)
१. कॅ. अवनी कानविंदे – द्वितीय क्रमांक इ.७ वी अ
निबंध स्पर्धा ( मोठा गट)
१.कॅ. मुक्ती पटेल – द्वितीय क्रमांक इ.९ वी ब
संवाद लेखन ( लहान गट)
कॅ. शिवांजली ढगे – उत्तेजनार्थ इ.७ वी ब
संवाद लेखन ( मोठा गट)
१. कॅ. आर्या अश्विनी बंगाळ – द्वितीय क्रमांक इ.९ वी अ
प्रश्नमंजुषा स्पर्धा
द्वितीय क्रमांक
१.कॅ. गिरीजा जोगळेकर इ. ९ वी ब
२.कॅ. श्रीशा देशमुख इ. ९ वी अ
मराठी विभाग प्रमुख सौ. सुनिता शिंदे
सौ. दिपाली आंबवणे
श्री. रविराज थोरात
श्रीमती प्रियांका राजहंस