15 जानेवारी आर्मी डे महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनानिमित्त म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली, ता. मुळशी जि. पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व मुळशी तालुका क्रीडा शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय भव्य मुलींची क्राॅसकंट्री स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन सैनिकी शाळेच्या माजी विद्यार्थिनी मेजर (निवृत्त) अर्चिस सबनीस, म.ए.सो. चे सहसचिव व क्रीडा वर्धिनीचे महामात्र श्री. सुधीर भोसले, क्रीडा म.ए.सो. क्रीडावर्धिनी समन्वयक पुणे क्रीडा भारती चे अध्यक्ष श्री. शैलेश आपटे, सैनिकी शाळेचे महामात्र डाॅ. उमेश बिबवे, शाळेचे कमांडंट ए.वि.एन विंग कमांडर श्री. एम यज्ञरामन, प्राचार्या श्रीमती पूजा जोग, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, श्री. संदीप पवार यांच्या हस्ते झाले, तर पारितोषिक वितरण पंचायत समिती मुळशीच्या माजी उपसभापती सौ. सारिका मांडेकर, शाला समिती अध्यक्षा तथा म.ए.सो. नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील, शाळेच्या महामात्रा प्रा. चित्रा नगरकर, क्रीडा समन्वयक श्री. राजकुमार शिर्के, पालक प्रतिनिधी श्री. सूर्यकांत निठुरे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धा वयोगट १२, १४ व १७ फक्त मुलींसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे.
वयोगट — 12 मुली
१) प्रथम क्रमांक — आराध्या गायकवाड — पुणे ॲथलेटिक्स क्लब.
२) द्वितीय — रक्षिता राठोड — पुणे ॲथलेटिक्स क्लब
३) तृतीय — अनुदा सवदी — द्वारका स्कूल चाकण,
उत्तेजनार्थ
१) अन्विता बोरडे — बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल
२) कॅडेट वैदेही नेमट — सैनिकी शाळा
३) स्नेहल जगदाळे — सैनिकी शाळा.
वयोगट — 14
१) प्रथम — आर्या डोके — न्यू स्कूल लांडेवाडी ता. आंबेगाव
२) द्वितीय — आदिती भड — भारतीय जैन संघटना वाघोली
३) तृतीय — आकांक्षा पवार — रेणुका स्वरुप हायस्कूल पुणे
उत्तेजनार्थ
१) सई कराळे — सेंट जोसेफ हायस्कूल.
२) इच्छा जाधव — न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी.
३) तनिष्का कोलवडकर — भारतीय जैन संघटना
वयोगट 17 मुली
१) प्रथम क्रमांक — अ दिती हारगुडे — भारतीय जैन संघटना
२) द्वितीय — आर्शिया पवार — पुणे ॲथलेटिक्स क्लब
३) तृतीय — श्रेया मालुसरे — पुणे ॲथलेटिक्स क्लब
उत्तेजनार्थ
१) आदिती तांबे — भारतीय जैन संघटना, वाघोली
२) सृष्टी हंडगर — भारतीय जैन संघटना, वाघोली
३) नेत्रा मच्छा — पुणे ॲथलेटिक्स क्लब
एकूण तीन वयोगटात मिळून ३५२ खेळाडूंनी सहभाग घेतला,क्राॅसकंट्रीची चॅम्पियन शिप भारतीय जैन संघटना शाळेने पटकावली. मेजर (निवृत्त) अर्चिस सबनीस यांनी आपल्या जीवनात खेळाचे खूप च महत्व असल्याचे सांगितले, सौ. सारिका ताई मांडेकर यांनी जीवनात खिलाडूवृत्ती हा गुण फक्त खेळामधूनच विकसित होतो हे सांगितले, अध्यक्षीय मनोगतात सौ. आनंदी पाटील यांनी क्राॅसकंट्री ही स्पर्धा स्वतः ची शारीरिक मानसिक क्षमता सिद्ध करण्यासाठी महत्वाची आहे हे सांगितले. प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांनी केले. आभार क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर यांनी मानले, स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी म्हणून श्री. मंगेश भालेराव यांनी कामकाज केले. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे कमांडंट ए.वि.एन विंग कमांडर श्री. यज्ञरामन सर व प्राचार्या श्रीमती पूजा जोग मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सैनिकी परिवाराने केले होते.