Inspire award Manak – मार्गदर्शनपर कार्यशाळा
28 जुलै 2024ः
इ.6 वी ते 10 च्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनात विज्ञानाची गोडी लागावी, त्यांच्या वैज्ञानिक कल्पनांना व विचारांना वाव मिळावा यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार मार्फत इन्स्पायर मानक अवॉर्ड हा उपक्रम प्रतिवर्षी राबवला जातो. शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरात उद्भवणाऱ्या समस्यांवर वैज्ञानिक कल्पनांद्वारे उपाय शोधण्यासाठी हा उपक्रम एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देतो.
दि.28 जुलै रोजी प्रशालेत IISER Pune , Science activity center मधील project associate कु. श्रद्धा भुरकुंडे यांनी Inspire award साठी innovative ideas कशा असाव्यात याबाबत मार्गदर्शन केले.इन्स्पायर मानक अवॉर्ड मध्ये नोंदणी करण्यापासून राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या उपक्रमांची माहिती दिली.आपल्या परिसरातील समस्यांचा शोध घेऊन त्यावर उपाय शोधण्यासाठी innovative ideas कोणत्या टप्प्यांचा विचार करून तयार करता येईल याबाबत सविस्तर माहिती दिली. याचबरोबर अनेक वैज्ञानिक खेळ घेतले व बारीक-सारीक निरीक्षणाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगितले. आपण आपल्या निसर्गाशी व परिसराशी कसे जोडले गेलो पाहिजे याचीही शिकवण दिली. कोणत्याही अडचणींचा सर्व बाजूंनी विचार करून त्याचा उपाय शोधण्याच्या SCAMPER या पद्धतीची ओळख करून दिली.
एक नवीन, आनंदी व विज्ञानमय अनुभव घेण्याची संधी कडेट्सना मिळाली.