मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी ICMR – National Institute Of Virology (NIV) पाषाण, पुणे या संस्थेच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त यंदा पहिल्यांदाच शालेय विद्यार्थी व विज्ञान शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते.
विज्ञान भारती, पश्चिम प्रांत यांच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील निवडक 12 शाळांतील 24 विदयार्थी व प्रत्येक शाळेतील 1 विज्ञान शिक्षक यांना या भेटीची संधी मिळाली.
प्रशालेतील इयत्ता 8 ब मधील कॅडेट शिवांजली ढगे व इयत्ता 9 ब मधील कॅडेट अनया कदम व विज्ञान अध्यापिका – ATL in charge सौ. मंजिरी पाटील यांनी NIV संस्थेस भेट दिली.
या भेटीत संस्थेच्या सर्व विभागांचे संशोधन विषयक माहिती पोस्टर प्रदर्शनातून विभागातील सदस्यांनी करून दिली.
Entomology, serology व PCR 3 या प्रयोगशाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील कामकाज व विषाणू संशोधनाबाबतचे टप्पे, विविध उपकरणे, तंत्रज्ञानाचा वापर, विषाणूजन्य आजार, विषाणूंच्या प्रजाती, कीटक व प्राण्यांमार्फत रोगप्रसार, रोगांच्या साथी व त्यावरील लस निर्मिती प्रक्रिया याबाबत वैज्ञानिकांनी शास्त्रशुद्ध माहिती देऊन मार्गदर्शन केले तसेच शास्त्रज्ञांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.
संशोधन क्षेत्रात योगदान देण्याची प्रेरणा निश्चितच विद्यार्थिनींना या भेटीतून मिळाली.
समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. व्ही.एम. कटोच, माजी सचिव डीएचआर आणि डीजी, आयसीएमआर आणि डॉ. एस. पती, अतिरिक्त डीजी, आयसीएमआर हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते तर सन्माननीय अतिथी. डॉ. राजीव बहल, सचिव डीएचआर आणि डीजी, आयसीएमआर यांनी व्हर्च्युअल उपस्थितीद्वारे मार्गदर्शन केले.
विविध विभागांच्या विशेष कामगिरीबद्दल सत्कार समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने चैतन्य वाढवले.