आषाढी एकादशीचे औचित्य साधून वारीच्या परंपरेची माहिती विद्यार्थिनींना विशेषतः पुढील पिढ्यांना होण्यासाठी प्रशालेत आषाढी
एकादशीच्या आधी वारीचे आयोजन केले गेले. यामध्ये इयत्ता ५ वी तील साया साळवे-विठ्ठल, संस्कृती गिरासे-रखुमाई आणि सर्व विद्यार्थिनी वारकरी म्हणून सहभागी झाल्या.

वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्त्वाचे स्थान आहे. हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंग रचना याचे
गायन वृंदा गांजुरे, समृद्धी साखरे या विद्यार्थिनींनी केले तसेच वैभवी इंगवले, केतकी घोडके, तेजस्वीनी बांदल, रिया देशपांडे या विद्यार्थिनींनी
विठ्ठलाचे गुणगान करणारी गीते सादर केली. या कार्यक्रमास इयत्ता ५ वी वर्गशिक्षक श्रीमती सविता हिले, श्रीमती प्रमिला महाले यांनी मार्गदर्शन
केले. तसेच कमांडंट श्री. सारंग काशीकर आणि मुख्याध्यापिका पूजा जोग यांचे सहकार्य लाभले. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या
विठूमाऊलीच्या आनंद सोहळ्यात तल्लीन होण्याचा अनुभव सैनिकी परिवाराने घेतला. टाळ-मृदुंगाच्या गजरात गणपती आणि विठ्ठलाच्या
आरतीने सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी,
राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा,
कासार आंबोली, ता. मुळशी, जि. पुणे
संस्कृत दिन आणि महाकवी कालिदास जयंतीनिमित्त
संस्कृत काव्यवाचन स्पर्धा
संस्कृतं ये प्रशंसन्ति ये प्रशंसन्ति संस्कृतिम्
स्वदेशं ये च शंसन्ति धन्यं जीवन्ति ते नरा:।।
-संस्कृत विभाग (विभाग प्रमुख – साईनाथ जगदाळे)

शुक्रवार दि.१३ जुलै २०१८ रोजी महाकवी कालिदास जयंती व संस्कृत दिननिमित्त संस्कृतकाव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली, नंतरमान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विभागातील संस्कृत अध्यापक साईनाथजगदाळे यांनी सरस्वतीवंदना सादर केली व उपस्थितांचेस्वागत केले. त्यानंतर प्रशालेतील इ.१० वीच्या विद्यार्थिनींनीमहाकवी कालीदास गीत सादर केले.

या कार्यक्रमाला प्रशालेतील मा. प्राचार्या मा. जोग मँडम, कमांडट सारंग काशिकर सर, उपप्राचार्य कुलकर्णी सर, पर्यवेक्षक नांगरे सर व पवारसर तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत विभागाचे प्रमुख यांनी केले. त्यामध्ये महाकवी कालीदास जयंती व दीप अमावस्या याविषयी थोडक्यात माहिती सांगितली गेली. ती माहिती सांगत असताना त्यामध्ये विविध श्लोकांचे दाखले सरांनी दिले. ते पुढीलप्रमाणे –

कालिदास जयंती
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रिडापरिणत गजप्रेक्षणीयं ददर्श ।। मेघदूत।।

पुरा कवीनां गणनाप्रसंगे
कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा:।
अद्याSपि तत्ततुल्यकवेरभावात्
अनामिका सार्थवती बभूव।।
दीप अमावस्या
दीपज्योति: परब्रम्ह दीपज्योतिर्जनार्दन:
दीपो हरति पापानि दीपज्योतिर्नमोSस्तुते।।

या श्लोकांतुन आजच्या दिनाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. या नंतर अध्यक्षांची परवानगी घेऊनप्रमुख कार्यक्रम संस्कृतकाव्यवाचन स्पर्धा सुरु करण्यात आली. काव्यवाचन स्पर्धची संपूर्णमाहिती परिक्षा विभाग प्रमुख सौ. शिंदे मँडम यांनी सांगितली. इ. १२ वी ते इ. ५ वी अशा पध्दतीने स्पर्धा घेण्यात आली. काव्यवाचन स्पर्धेच्या परिक्षक – मा. प्रणाली गोगटे मँडम काव्यवाचन झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सम्मान सोहळा झाला. नंतर पाहुण्यांचे मार्गदर्शनपर मनोगत झाले. त्यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व व व्याकरणाचा वापर कसा करावा. याद्दल सविस्तरमाहिती दिली. नंतर अध्यक्षिय भाषण मा. प्राचार्या जोग मँडम यांनी केले. त्यांनी विद्यार्थिनींनी जास्तीत जास्त संस्कृतच्या वाङ्मयांचा अभ्यास करावा, असे आवाहन केले. आणि कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन महाले मँडम यांनी केले. नंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रम पत्रिका

दीप प्रज्वलन व प्रतिमा पुजन (प्रमुख पाहुणे, मा. प्राचार्या, उपप्राचार्य, पर्यवेक्षक)
समुह गीत (प्रशालेच्या विद्यार्थिनी)
प्रास्ताविक (साईनाथ जगदाळे सर)
विद्यार्थिनी मनोगत (इ.१२वी-वेदश्री तेंडुलकर)
संस्कृत काव्यवाचन स्पर्धा (इ.५वी ते १२वी)
परिक्षक परिचय
परिक्षक मनोगत
अध्यक्षिय भाषण
आभार (मा. महाले मँडम)
समारोप (सामुहिक पसायदान)

दरवर्षीप्रमाणे दिनाक ७ जुलै शनिवार रोजी प्रशालेत वर्धापनदिन साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्ताने

इयत्ता १० वी व १२ वी तील प्रथम पाच विद्यार्थिनींचा गुणगौरव करण्यात आला. श्री. हेमचंद्र इनामदार तसेच प्रशालेच्या हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच डॉ. मानसी भाटे, महामात्रा शाला समिती या देखील उपस्थित होत्या. पाहुण्याच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

इयत्ता १० वी गुणवंत विद्यार्थिनीं :
१) कु. श्वेता पाटील – ९४.८० %
२) कु. मानसी भामरे – ९४.२० %
३) कु. वृंदा मेस्त्री – ९३.८०%
४) कु. सृष्टी साळुंखे – ९३.४०%
५) कु. अनुष्का पगार – ९३ %

इयत्ता १२ वी गुणवंत विद्यार्थिनीं :
१) कु. दिक्षा खेडकर – ७२.४६ %
२) कु. प्राजक्ता डुकरे – ७०.६२ %
३) कु. नेहा लोंढे – ६८.४६ %
४) कु. स्नेहल ठाकरे – ६६.९२ %
५) कु समृद्धी खोत .– ६६.४६ %

बुधवार दि. २७ जून २०१८ रोजी दु. ४.०० वा. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी प्रशालेमध्ये हरित शिष्यवृत्ती व पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी पर्सिस्टंट फौन्डेशनच्या श्रीमती सोनाली देशपांडे, श्रीमती अनया नेतानराव व शाला समिती महामात्रा डॉ. मानसी भाटे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

हरित शिष्यवृत्ती व पुरस्कार वितरणाचे प्रशालेचे हे ९ वे वर्ष आहे. सैन्यप्रशिक्षणाबरोबर हरित प्रकल्प हा प्रशालेचा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. सदर उपक्रमामध्ये प्रशालेतील घन कचरा व्यवस्थापन, गांडूळ खत, भाजीपाला लागवड व एक मुल एक झाड इ. विविध गोष्टी मुली करतात. शाळा निवासी असल्याने कचऱ्याची समस्या प्रशालेताही आहे. यामध्ये वसतीगृह, भोजनालय व प्रशाला या तीनही ठिकाणी कचरा निर्माण होतो. कचरा प्रशालेच्या बाहेर न जाऊ देता विद्यार्थिनी प्रशाला परिसरातच गांडूळ खत व कॉम्पोस्टिंग च्या माध्यमातून परिसरातच जिरवतात. प्लास्टिक तसेच ओला व सुका कचरा वेगळा करून त्या त्या ठिकाणी त्याची विल्हेवाट केली जाते.

या व्यतिरिक्त मुलींमध्ये पर्यावरण विषयक जाणीव जागृती होण्यासाठी विविध उपक्रम,कार्यशाळा, तज्ञांचे मार्गदर्शन असे वर्षभर नियोजन केले जाते. यातूनच मुलींवर हरित संस्कार केला जातो. हरित शिष्यवृती व पुरस्कार प्राप्त होण्यासाठी विद्यार्थिनीचा वर्षभर या उपक्रमांमध्ये सक्रिया सहभाग व त्याच्या नोंदी ठेवाव्या लागतात. त्यानंतर विद्यार्थिनींची लेखी परीक्षा, तज्ञांमार्फत मुलाखती घेतल्या जातात. सर्वोत्तम काम करणाऱ्या विद्यार्थिनीनाच हरित शिष्यवृती व पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चे हरित शिष्यवृत्ती ५ विद्यार्थिनींना देण्यात आली.

क्रमांकविद्यार्थिनींचे नाववर्गरक्कम
१सृष्टी प्रमोद कारखानीस६ अ२५०००
२वैभवी दिलीप  जाधव११ ब२००००
३सृष्टी बालाजी रायबन७ ब१५०००
४सृष्टी परमेश्वर बोऱ्हाडे६ अ१००००
५पायल धनंजय जासूद७ ब५०००

त्याचप्रमाणे
हरित पुरस्कार रु. २००० प्रत्येकी, पुढील ९ विद्यार्थीनीना प्रदान करण्यात आली.

क्रमांकविद्यार्थिनींचे नाववर्गरक्कम
१पायल मांडेकर७ ब२०००
२सई मिलिंद खानविलकर७ ब२०००
३वैष्णवी कवडे११ ब२०००
४साक्षी सुखदेव शिरसकर१० अ२०००
५जागृती जयसिंग खुंटे१० ब२०००
६ऐश्वर्या अनिल राऊत५ ब२०००
७वेदश्री वसंत बाबर५ अ२०००
८राधिका पोपटराव चांदगुडे८ अ२०००
९पलक किरण मिठारी८ ब२०००

सर्व शिष्यवृती व पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनींचे मान्यवर व  सैनिकी परिवाराने कौतुक केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पर्यावरण विभाग प्रमुख श्री. श्याम नांगरे व पर्यावरण विभाग सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती या निमित्ताने कुलश: वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे नियोजन इतिहास विभागातर्फे करण्यात आले. खालीलप्रमाणे भाषा व विषयानुसार गट विभागणी करण्यात आली,
गट क्र.१) ५वी व ६वी मराठी
गट क्र.२) ७वी व ८वी मराठी
१.बालपणीचे टिळक २. टिळक व गणेशोत्सव / शिवजयंती ३. टिळकांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान ४.असंतोषाचे जनक टिळक

गट क्र.३) ९वी ते १०वी हिंदी
१. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे २. तिलक और उनका लेखन ३. तिलक और भारतीय स्वतंत्रता संग्राम मे उनका योगदान

गट क्र.४) ११वी, १२वी English
1. Lokshahir Annabhau Sathe 2. Tilak and Wangbhang Movement 3. Tilak and ‘Geeta Rahasya’ in Mandalay

याबाबत विषय निवड, व्यासंग, विषय मांडणी, सादरीकरण, हावभाव, उच्चार, वेळ व अभिप्राय या मुद्द्यांनुसार मूल्यांकन करण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या सर्व विद्यार्थिनींना मुख्याध्यापिकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आली. या स्पर्धेत पहिला क्रमांक लक्ष्मी कुलाने पटकाविला.

Scroll to Top
Skip to content