या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत या शैक्षणिक वर्षात सुद्धा नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. या वर्षी इयत्ता ११वी कडे उत्सवाची जबाबदारी देण्यात आली होती. प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. यज्ञरामन सर व प्राचार्या सौ. ज्योती खिरीड मॅडम यांच्या उपस्थितीत दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता श्री. मंगेश पाटील यांच्या विधिवत देवीच्या पूजा अर्चनेसह नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली. सिनियर मास्टर अद्वैत जगधने सर यांच्या नित्यपूजेची सेवा, श्री. महेश शिंदे यांची आरती व संबळ सेवा यामुळे सात्विक वातावरणात नऊ दिवस देवीची आरती व आराधना करण्यात आली. शाळेतील ११वी च्या कॅडेटस ने प्रत्येक दिवशीच्या देवीच्या नऊ रूपांचे महत्त्व सांगितले. या देवी कार्यासाठी कर्मचारी वर्गाने आपला आर्थिक सहयोग स्नेहप्रबोधीनी प्रमुख सौ. वैशाली शिंदे यांच्या कडे जमा केल्याने नवरात्र उत्सव यशस्वी झाला. वसतिगृह विभाग श्रीमती प्रियांका गुरव व त्यांच्या सहकारी यांनी नियमित पूजेची तयारी करण्यास कॅडेट्स ना मदत केली. सुभेदार श्री. नवनाथ पवार सर यांच्या मेस विभागाने रोजचा नैवेद्य व प्रसाद अर्पण केला. दि. १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता सर्व कॅडेटस साठी गरबाची कुलनिहाय स्पर्धा प्रशालेत स्पर्धा विभाग प्रमुख श्री. प्रभात गुंड यांनी आयोजित केली होती. या प्रसंगी आपल्या प्रशालेच्या शालासमिती अध्यक्षा मा. सौ. आनंदीताई पाटील, महामात्रा सौ. चित्रा नगरकर, शिक्षण प्रबोधिनी च्या सौ. वर्षा न्यायाधीश मॅडम या सर्वांनी देवीची आरती करण्याचा लाभ घेतला. तसेच गरबाचा आनंद घेतला. गरबा स्पर्धेचे परीक्षण शिक्षक वसाहत मधील सौ. सुषमा पाटील, सौ. अश्विनी थोरात व श्रीमती प्रियांका गुरव यांनी केले. त्यानंतर भोंडला साजरा करण्यात आला.
खंडे नवमीला उत्सव समापनाची आरती होऊन शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता केली गेली.







































































































































































































































































































































































































































































































15 Aug 26 / Sat / 0730 hrs onward


































