
आज 15 ऑगस्ट 2025 रोजी राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भारतीय सैन्य दलातील माजी अधिकारी मेजर श्री. गौरव दुबे (निवृत्त) यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन झाले. याप्रसंगी सौ. टिनेबा दुबे, उद्योजक श्री. महेश पाटील, शाळेच्या महामात्रा प्रा. चित्रा नगरकर, स्काॅड्रन लीडर श्री. गोपालकृष्णन, श्री. श्रीरंग कुलकर्णी सौ. सविता कुलकर्णी, ॲड. श्री. हरिश्चंद्र खिरीड, शाळेचे कमांडंट विंग कमांडर एविएन श्री. एम. यज्ञरामन, शाळेच्या प्राचार्या सौ. ज्योती खिरीड, शाळेचे सीनियर मास्टर व पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, सुभेदार श्री. नवनाथ पवार, मंजिरी पाटील, महेश कोतकर हे उपस्थित होते. सैनिकी शाळेच्या कॅडेटस नी बॅंडच्या तालावर शानदार संचलन करत राष्ट्रीय ध्वजाला व प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. या निमित्ताने शाळेत कॅडेट्सचा पदवीदान समारंभ पार पडला. सर्व रँक होल्डर्स ला त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत रँक देण्यात आली. त्यानंतर बँडच्या पथकाचे प्रात्यक्षिकाचे सादरीकरण झाले. या वर्षी नव्यानेच दाखल झालेल्या 6 वी च्या स्काऊटच्या कॅडेटसचे ही शानदार संचलन झाले. आपल्या मनोगतात बोलताना अतिथी श्री. गौरव दुबे यांनी आज मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नसून सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या आपली वाटचाल करीत आहेत, सैन्य दलामध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी या बजावत आहेत आणि याचे उदाहरण म्हणजे आता सिंदूर ऑपरेशन मध्ये महिलांचे असलेले प्रत्यक्ष योगदान, यामुळे तुम्हाला आणखी संधी असल्याचे सांगितले. परेडचे नेतृत्व परेड कमांडर कॅडेट शैजल पाटील हिने केले होते.
79 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रशालेतील इयत्ता 10 वी अ ची cadet अश्विनी देवकर हिने प्रशालेतील विज्ञान अध्यापिका व मार्गदर्शक सौ. मंजिरी पाटील यांच्या सहकार्याने तयार केलेल्या आचार्य जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधनावर आधारित Inventor of Wireless communication “Acharya sir Jagdish Chandra Bose”- A Tribute या पुस्तिकेचे प्रकाशन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. प्रशालेचे हितचिंतक मा. श्री सतिशजी कुलकर्णी यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार शालेय विद्यार्थ्यांनी थोर भारतीय शास्त्रज्ञ आचार्य सर जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधन विषयक कार्याने प्रेरित व्हावे तसेच संशोधन क्षेत्रात भावी पिढीने योगदान द्यावे या उद्देशाने या पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे.
पुस्तकनिर्मिती साठी म.ए.सो. आजीव मंडळ सदस्या डॉ. नेहा देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे पर्यवेक्षक सिनियर मास्टर श्री. श्याम नांगरे यांनी संयोजन केले तर श्री. रविराज थोरात यांनी तांत्रिक सहकार्य केले.
या पुस्तिकेचे वितरण मएसो च्या विविध प्रशालेतील विद्यार्थी तसेच पुणे व ग्रामीण भागातील इ.9 वी च्या विद्यार्थ्यांना प्रशालेतर्फे करण्यात येणार आहे.
शिवगर्जनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.




















































































































































































































































































































































































































































































































































































