शानदार संचलन व प्रात्यक्षिकाद्वारे सैनिकी शाळेत गणतंत्र दिन साजरा…..
आज दि. 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथे ध्वजारोहण समारंभ उत्साहात साजरा झाला. आजच्या शानदार संचलनाचे नेतृत्व इ. 12 वी ची स्कूल कॅप्टन मुग्धा पाटे हिने केले. शानदार संचलनानंतर सायलेंट ड्रिल, आर्चरी, बॅंड, रायफल शूटिंग व मर्दानी खेळांची चित्तथरारक सैनिकी प्रात्यक्षिके झाली. एअर विंग एन.सी.सी च्या सार्जंट जान्हवी गायकवाड, सार्जंट सृष्टी तोंडे व कार्पोरल गिरिजा जोगळेकर यांना बेस्ट कॅडेट अवॉर्ड देण्यात आले, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वायूसेनेतील अधिकारी ग्रुप कॅप्टन नीरज भारद्वाज (निवृत्त) होते. सौ. श्वेता भारद्वाज, म.ए.सो संस्थेच्या उपाध्यक्षा व सैनिकी शाळेच्या अध्यक्षा सौ. आनंदी पाटील, शाळेच्या महामात्रा सौ. चित्रा नगरकर, पालक-शिक्षक संघ उपाध्यक्षा सौ. अपर्णा धर्माधिकारी, शाळेचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक यावेळी उपस्थित होते.
Feedback from
Gp Capt Niraj Bharadwaj
The Chief Guest & Reviewing Officer….
It was an amazing day for us to have witnessed or be part of this astounding display of fantastic management of the RD Function at Rani Laxmi Bai Girls Sainik School, Pirangut.
With an all pervasive warmth and perfection in all aspects, the Management and staff coupled with superb performance by the girl cadets during the entire function right from reception to on ground performance, deserves special mention !!!
My wife Shweta joins me in expressing our heartfelt gratitude and appreciation.
Thanks… 🙏
Jai hind !!!…