उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी या परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला. आपल्या प्रशालेतील एकूण ८३ विद्यार्थिनी या परीक्षेत बसलेल्या होत्या. त्यापैकी एकूण २४ विद्यार्थिनी पात्र झाल्या आहेत.
निकालाचे विश्लेषण…
पहिल्या पाच विद्यार्थिनी निकाल

१) कॅ. स्वरा कल्पेश घोडके २२६/३००
२) कॅ. अस्मी अतुल पाटील २२०/३००
३) कॅ. सावली संतोष बिराजदार १८२/३००
४) कॅ. आर्या भिवाजी बिराजदार १७६/३००
५) कॅ. सौम्या नाथसाहेब म्हेत्रे १७४/३००
पात्र विद्यार्थिनी – २४
अपात्र विद्यार्थिनी- ५२
अनुपस्थित – ०७
परीक्षेत बसलेले विद्यार्थिनी – ८३
सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन. विद्यार्थिनींना सतत प्रोत्साहन करणारे प्रशालेचे कमांडंट एवियन विंग कमांडर एम यज्ञरामन व प्राचार्या सौ. ज्योती खिरीड या सर्वांचे अभिनंदन…

27 Jul 26 / Mon

कारगिल विजय दिवस प्रशालेत उत्साहात साजरा

दिनांक 27 जुलै रोजी कारगिल विजय दिवस प्रशालेत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त प्रशालेमध्ये कॅडेट्सनी सकाळच्या सत्रामध्ये संचलन केले. कॅडेट् इशिता इंगोले, कॅडेट मनस्वी आचार हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कॅडेट हेजल वेदपाठक व कॅडेट गायत्री आखाडे हिने कारगिल विजय दिवस निमित्त माहिती दिली. याचवेळी शाळेतील अपॉइंटमेंट कॅडेट्स ची नावे जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन माननीय कमांडंट विंग कमांडर एम यज्ञरमण सर व माननीय प्राचार्य सौ ज्योती खीरीड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सैन्य व क्रीडा प्रशिक्षण विभाग प्रमुख हवालदार श्री गजानन माळी व सैन्य प्रशिक्षण विभाग यांनी केले.

KVD was seen through with reverence and enthusiasm at MES RLMSS with a Ceremonial Parade during the wee hours, followed by a Special Assembly of the day.

Cadets of Class XI organised the Special Assembly in which Cdts Gayatri Akhade, Hazel Vedpathak, Ishita Ingole and Manasvi Achar demonstrated their shared contribution by way of their informative short speeches and moderation.

Toward the end of the event, the following caregories of Cadets were lined-up for a Group Photograph as they stand deep selected to tenate various appointments for the current Academic Year : 2026-27.

RLMSS Selected School Appointment Designates
Academic Year : 2026-27

All from Class XII,

Academy Cadet Captain – ACC :
Cdt Rutuja Rajesh Sinkar

Academy Cadet Adjutant – ACA
Cdt Rutuja Bhimrao Kapre

Sports Cadet Captain – SCC
Cdt Aabhashree Shindikar

Sports Vice Captain – SVC
Cdt Sakshi Neral

Culturals Cadet Captain – CCC
Cdt Apurva Kenjale

Culturals Vice Captain – CVC
Cdt Vaishnavi Vineet Godbole

House Appointment Designates

Ahilya House Cadet Captain – AHCC
Cdt Anushka Uttam Patil

Ahilya House Cadet Adjutant – AHCA
Cdt Mugdha Gaikwad

Jijamata House Cadet Captain – JHCC
Cdt Yukti Rohit Bhanushali

Jijamata House Cadet Adjutant – JHCA
Cdt Dnyaneshwai Shinde

Laxmi House Cadet Captain – LHCC
Cdt Mahima Nilesh Mahapure

Laxmi House Cadet Adjutant – LHCA
Cdt Pratiksha Shinde

Durgavati House Cadet Captain – DHCC
Cdt Divya Gajanan Shiraskar

Durgavati House Cadet Adjutant – DHCA
Cdt Aatmaja Gonate

Cadet Band Master – CBM
Cdt Devika Suhas Tad of Class X

NCC Appointments of 3 Maharashtra Air Sqn NCC RLMSS

All from Class IX

Sergeant Appointments :
Cdt Kashish Bipin Wale &
Cdt Daksha Yugendra Katore

Corporal Appointments:
Cdt Swaranjali Sandip Powar &
Cdt Aaradhya Prakash Rao

Leading Flight Cadet Appoinrments :
Cdt Janhavi Rajesh Maharnur &
Cdt Saeeraje Sangaram Deshmukh

RLMSS Bharat Scouts & Guides – Guide Company Cadet Appointments

All from Class X

1. Guide Company Leader –
Cdt Gayatri Rasal

2. Assistant Guide Company Leader –
Cdt Samruddhi Balkawade

3. Patrol Leaders –
Cdt Saanvi Murari and
Cdt Hindavi Gursale

With best of our wishes…

~ The MES RLMSS Family, Pune

For more photos please click 👇
https://drive.google.com/drive/folders/13ZCqT5DHLZSpHWIzwOtLxj7fQi4JEzXH?usp=drive_link

आषाढी एकादशी हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा वारकरी सण आहे. वारकरी परंपरा भक्ती आणि एकात्मतेचे संस्कार विद्यार्थिनींमध्ये रुजावेत यासाठी म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत दि. २४ जुलै २०२६ रोजी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला.
शाळेच्या सभागृहात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या गजरात इ. सहावीच्या विद्यार्थिनींनी पालखी आणली. सहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः ही पालखी बनवली व सजवली होती. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ ज्योती खिरीड, सीनियर मास्टर श्री अद्वैत जगधने यांनी पालखीचे पूजन व आरती केली. प्रशालेचे शिक्षक श्री प्रभात गुंड यांनी आषाढी एकादशी व वारीचे महत्त्व सर्व विद्यार्थिनींना सांगितले. सहावीच्या विद्यार्थिनींनी संतांची वेशभूषा व त्याचे सादरीकरण केले. पालखी सोहळ्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व वसतिगृह विभाग सर्व सदस्य उपस्थित होते. पालखी सोहळ्यानंतर कुलशः अभंग गायन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

पालखी फोटो बघण्यासाठी 👇 लिंक…
https://drive.google.com/drive/folders/1_ejbWCz8Uz1Uz1ctI-HQgIfZk9yqpl79?usp=drive_link

22 Jul 26 / Wed

Shikshan Samvad – 2026

Commandant RLMSS, in a first ever was invited by Department of School Education and Sports, Govt of Maharasthra as a subject expert and panelist for the first ever ‘Shikshan Samvad’ held at the newly constructed state of the art ‘Bal Bhavan’, Cherni Road, Mumbai.

The daylong workshop was presided over by ‘Mananiya Shikshan Mantri Shri Dadaji Bhuse’ and also graced by the august presence of a galaxy of high ranking officials of the Govt of Maharashtra.

The talk with respect to general policies and in particular that of RLMSS including holistic development and welfare of Cadets of the ‘First ever All Girls Sainik School of country’, aimed at excellence in all faculties.

Well received.

Hoping to take this to further heights.

jayahind.

~ The MES RLMSS Family, Pune

For more photos click 👇
https://drive.google.com/file/d/12emhEDa6fCIlXsKOvPN7Gt7QZ3mMG_kv/view?usp=sharing

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळा, कासार आंबोली येथे १८ जुलै २०२६ रोजी ‘पावनखिंड दिन’ देशभक्ती, शौर्य आणि इतिहासप्रेमाच्या वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींमध्ये स्वराज्याचा इतिहास, राष्ट्रभक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा जागविण्याच्या उद्देशाने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या परिसरातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून व शिवज्योत प्रज्वलित करून झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात सकाळी ७ वाजता ‘पावनखिंड दिन’ मोहिमेला प्रारंभ झाला.

शाळेपासून सुमारे साडेआठ किलोमीटर अंतरावरील कासार आंबोली येथील गवळीवाडा परिसरातील भैरवनाथ मंदिरामागील टेकडीपर्यंत विद्यार्थिनींनी शिस्तबद्ध पायी संचलन केले. संपूर्ण मार्गात ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

सकाळी साडेनऊच्या सुमारास टेकडीवर पोहोचल्यानंतर शाळेचे सीनियर मास्टर अद्वैत जगधने यांनी पावनखिंडच्या ऐतिहासिक लढ्याचे महत्त्व, वीर बाजीप्रभू देशपांडे यांचे अद्वितीय शौर्य आणि स्वराज्यरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची सविस्तर माहिती विद्यार्थिनींना दिली. इतिहासातील प्रेरणादायी प्रसंग ऐकताना विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या उपक्रमाचे आयोजन प्रशालेचे कमांडंट विंग कमांडर एम. यज्ञरामन आणि प्राचार्या ज्योती खिरीड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शाळेचे सैन्य व क्रीडा प्रशिक्षण प्रमुख गजानन माळी तसेच क्रीडा शिक्षक महादेव मगर यांनी उपक्रमाचे नियोजन व यशस्वी अंमलबजावणी केली.

इतिहास, शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती आणि राष्ट्रभक्ती यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरला. उपस्थित शिक्षकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये स्वराज्याचा अभिमान आणि राष्ट्रीय मूल्ये अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले.

14 Jul 26 /Tue

AnandvArtA…


Commandant RLMSS Empanelled by UPSC as Expert Advisor; Conferred with Prestigious Tech Saga-2026 Award…

— In a moment of distinguished recognition that underscores excellence in public service and technological leadership, Commandant RLMSS has been empanelled by the Union Public Service Commission (UPSC), Government of India, as an Expert Advisor.
This high-level empanelment reflects Commandant RLMSS’s outstanding expertise, strategic acumen, and proven contributions in his domain — a testament to years of dedicated service and visionary leadership within the MES (Maharashtra Education Society).
Adding further lustre to this achievement, Commandant RLMSS has been conferred with the Tech Saga-2026 Award. His accomplishments have been immortalised with a prestigious feature in the official Coffee Table Book of Tech Saga-2026 — a collector’s edition that celebrates the finest minds shaping India’s technological and administrative future.

With best of our wishes,

~ The MES RLMSS Family, Pune

Admission 2026-27
N.B. – Admissions to “Class 11th” is without Centralised process.

ADMISSION FORM is OPEN only for CLASS : 6th (English + Semi-English medium) and CLASS : 11th (Science stream – PCMB Group)

RLMSS Pune Admission Link : 2026-27
https://mesrlmsss.ethdigitalcampus.com/DCWeb/form/jsp_aaa/OnlineAdmissionDashboard.jsp?dbConnVar=MESRLMSSS&portalFlag=adm

Admissions info :-
https://rlmss.mespune.in/admissions/

Contact hours – from 1000 am to 1600 pm on all working days.

Dear Parents,👇
After having submitted the online application form and ₹ 500 paid, kindly WhatsApp the following details
to 8412014934 For joining the Admissions Group.

➡️ Name of the Girl Child :

➡️ Online application submitted for Class :

➡️ Medium:

➡️ Place :

➡️ Rs. 500 : paid

प्रिय पालकांनो, 👇
ऑनलाइन अर्ज (फॉर्म) सबमिट केल्यानंतर आणि ₹ ५०० पेमेंट केल्यानंतर, कृपया खालील तपशील WhatsApp करून ८४१२०१४९३४ या क्रमांकावर पाठवा.
WhatsApp Admission group मध्ये सामील होण्यासाठी.
➡️ मुलीचे नाव :
➡️ ऑनलाइन अर्ज कोणत्या इयत्तेसाठी सबमिट केला :
➡️ माध्यम :
➡️ ठिकाण :
➡️ ₹ ५०० : पेमेंट केले आहे

(कृपया हे तपशील लवकरात लवकर पाठवा, धन्यवाद!)

Annual Expenses :

For all classes : ₹ 1.75 L (includes all expenditure)
Additionally, only during the first year of admission to any class : ₹ 50,000 (Caution Deposit, refundable under normal circumstances after passing Class XII)

https://www.facebook.com/share/r/1CXEGYg1Y9/


७ जुलै हा राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेचा वर्धापन दिन आहे. प्रशालेची स्थापना सात जुलै 1997 रोजी झाली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलनानंतर विद्येची देवता, सरस्वती, राणी लक्ष्मीबाई तसेच मएसोचे संस्थापक यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सौ. मंजिरी पाटील यांनी प्रशालेच्या दृष्टीने आजच्या दिनाचे महत्त्व विशद केले, तर सिनियर मास्टर श्री. अद्वैत जगधने यांनी सोसायटीची माहिती, ध्येय व उद्दिष्टे सांगून त्या उद्दिष्ट्याला अनुसरून राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले. त्यांनी प्रशाला स्थापने मागचा उद्देश लक्षात घेऊन वाटचाल करण्याचे विद्यार्थिनींना आवाहन केले. प्राचार्या ज्योती खि्रीड यांनी शुभेच्छा देताना सैनिकी शाळेच्या ध्येयाची आठवण करून दिली, तर प्रशालाचे कमांडंट विंग कमांडर एम. यज्ञरामन यांनी ‘Atleast 30 by 2030’ या उद्दिष्टाकडे वाटचाल करण्यास सांगितले. कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन श्री महेश कोतकर यांनी केले.


MES RLMSS Foundation day pgm photos –
https://drive.google.com/drive/folders/1AW10voRXmCEQrhHFiOBJWxkVsjf5Mulv?usp=drive_link

RLMSS Motivational Lecture – 04 Jul 26 / Sat

jayahind…

As part of our ongoing Leadership Training Module,
Ms Hemalata Sridhar a successful career woman from New Jersey, USA addressed the Cadets of Class IX to XII at the MP Auditorium (HQ MTW), MES RLMSS Campus.

In an informal, interactive format, the Guest Speaker highlighted various aspects of her journey from a humble beginning towards success and holistic development, keeping pace with the rigour and professional demands of this ever competitive world around.

Following that
Mr Narayanan K Sridhar and Ms Sneha Sridhar too addressed the gathering quoting a few interesting but relevant anecdotes of life skills, professional growth and leadership roles.

Cadets were grossly appreciated for their enthusiasm laced disciplined conduct and inquisitiveness.

Cdt Yukti Bhanushali of Class XII, Jijamata House proposed the vote of thanks.

A well received talk.

With best of our wishes,

~ The MES RLMSS Family, Pune

jayahind…

sarvAnnA namascAr…

Dear Parents,

Kindly note the following contact numbers to call / post your queries, other than Hostel related issues.

Timing :
Mondays to Fridays :
1000 to 1700 hrs (10 AM to 5 PM)

Saturdays :
1000 to 1300 hrs (10 AM to 1 PM)

Kindly avoid trying on Sundays / Closed Holidays as the Office does not function on these days.

Contact / WhatsApp Numbers :

84120 14941
93229 93302

Thanks.

🙏
~ The MES RLMSS Family, Pune

AnandvArtA….

RLMSS Air NCC Cadets made us proud…again….

~ Competiong among 8 Schools of Pune, racing tough competition, our 2nd year Air NCC JW Cadets did exceptionally well and won string of prizes and awards in the CATC-711 (Combined Annual Training Camp) held at NCC Gp Hq premises from 15 Jun to 24 Jun 2026.

~ The Success Story of RLMSS is highlighted by the following achievements :

1. Throw ball : Runner up

2. Drill Competition : Winners

3. Best Cadet JW : Runner up Cpl Aaradhya Prakash Rao

4.Overall Championship : Winners

Heartiest congratulations to dear Cadets, ANO Sou Rajashree Gophane and the doting, ever supportive Parents.

We are on a Mission…

With best of our wishes,

~ The MES RLMSS Family, Pune

Throw ball Runner up

Winner in drill competition

Best Cadet JW Runner up Cpl Aaradhya Prakash Rao

Winner in Overall Championship

Drill Competition

22 Jun 26 / 0530 hrs onward

~ Special Assembly

~ Introductory talk on International Yoga Day by Cdt Abhashree Shindikar, XII, Ahilya House

~ Conduct of Displays and Session by Ms Preeti Walke, Yoga Instructor & RLMSS Cdt contingent

~ Special, yogic intuitive talent presentation by Cdt Meher Rahul Samat, VIIB, Lskshmi House

And…a few more…

A well coordinated and conducted a celebration it turned out to be.

Memorable.

~ The MES RLMSS Family, Pune


As Cdt Meher Rahul Samant of class 7th B, have had completed IP 1 and IP 2 course of Art of living, she presented ‘Intuition demo’ on the occasion of Yoga day.

18 Jun 26 / Thu

Rani Lakshmibai puNyatithi celebration at MES RLMSS

१८ जून १८५८ झाशीची राणी लक्ष्मीबाई – हुतात्मा दिन – विनम्र अभिवादन….
राणी लक्ष्मीबाई यांच्या नावानेच सुरू असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेमध्ये राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या 168 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रशालेच्या आवारामध्ये दिमाखात उभा असणारा लढवय्या राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याला प्रशालेचे कमांडंट श्री. एम. यज्ञरमन त्याचबरोबर प्राचार्या सौ. ज्योती खिरीड व इतर ज्येष्ठ शिक्षक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या याप्रसंगी इतर शिक्षक व शिक्षकेतर तिथे उपस्थित होते.

आज झालेल्या कुलश परिपाठात प्रत्येक हाऊसने राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी सर्व विद्यार्थिनींना माहिती दिली. त्याचबरोबर प्रशालेमध्ये राणीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्वांनी राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केले. याप्रसंगी सिनियर मास्टर श्री. अद्वैत जगधने यांनी थोडक्यामध्ये राणी लक्ष्मीबाई यांनी गाजवलेले शौर्य आणि त्यांचे वेगळेपण याची विद्यार्थिनींना ओळख करून दिली.

– 13 Jun 26

MES, Personality Development Center presents World Mental Health Day Celebration 2025
Co- Ordinated and Organised by Mrs. Shreya Dighe and Ms. Rasika Rane

दिनांक : 09 ते 15 मे 2026
स्थळ : रामबाग, भोर.
म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील स्काऊट शिक्षिका श्रीमती प्रियांका विश्वास गुरव या स्काऊट-गाईड प्रशिक्षण, रामबाग भोर येथे सहभागी झाल्या होत्या. हे प्रशिक्षण शिबिर अत्यंत उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरले. शिबिरामध्ये शिस्त, स्वावलंबन, नेतृत्वगुण आणि समूहभावना विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला.
प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर स्काऊट-गाईडचे नियम, प्रतिज्ञा, ध्वजवंदन, प्राथमिक उपचार, गाठी बांधणे, नकाशा वाचन, शिस्तबद्ध संचलन इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. विविध प्रात्यक्षिकांद्वारे आम्हाला प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.

शिबिरादरम्यान अनेक सांघिक उपक्रम, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तिपर गीते आयोजित करण्यात आली. त्यामुळे सहभागी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सहकार्याची भावना आणि नेतृत्वगुण वाढीस लागले. प्रशिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन अत्यंत प्रभावी व प्रेरणादायी होते.
या प्रशिक्षणातून स्वावलंबन, वेळेचे नियोजन, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व समजले. हे शिबिर अत्यंत संस्मरणीय आणि उपयुक्त अनुभव ठरले. याचा उपयोग सैनिकी शाळेतील कॅडेटससाठी होणार आहे अशी प्रतिक्रिया श्रीमती प्रियांका गुरव यांनी दिली.
सैनिकी शाळेचे कमांडट एविएन विंग कमांडर म. यज्ञरामन सर, मुख्याध्यापिका. सौ. ज्योती खिरीड मॅडम, सीनियर मास्टर श्री. संदीप पवार सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Inter Unit Sports Shooting Championship (IUSSC) for the year 2026, was conducted by 2 Mah Girls Bn wef 20 to 22 Apr 2026 at Short Range, NCC Gp HQ, Pune änd firing range at BEG Centre Khadki.

Our Air NCC cadet – Cdt Janhavi Rajesh Maharnur won 1 Gold Medal in Application fire in all Junior boys and girls and 1 Bronze Medal in Grouping fire in Junior girls category.

Janhavi’s outstanding performance in the application firing event cause the 3 Maharashtra Air Squadron NCC, Pune Unit secured the second place in Pune Group.

Thank you to the Commandant Wg Cdr Yagnraman sir, Principal Mrs. Jyoti Khirid ma’am and Senior Master Sandeep Pawar Sir for their support and cooperation.

Special thanks to ANO T/O Rajashree Gophane ma’am and Military Instructor Ex Hav Gajanan Mali sir for their guidance.

MES RLMSS – Camp Shaurya – 2026 – II

म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत दि. 2 मे ते 9 मे 2026 या कालावधीत कॅम्प शौर्य – 2 उत्साहात संपन्न झाला.

इ.6 वी ते इ.11 वी च्या एकूण 126 कॅडेट्स ने सैनिकी शाळेच्या साहसी उपक्रमात सहभाग घेतला. आर्टिफिशियल वाॅल क्लांइबिंग’, रिव्हर क्राॅसिंग, स्विमिंग, रायफल शूटिंग, रायडिंग, कराटे, Obstacles, शिवकालीन मर्दानी खेळ, बँड, आपत्ती व्यवस्थापन, बौद्धिक खेळ, कॅम्प फायर, नाईट रुट मार्च, तंबू बांधणे, ड्रिल SSB प्रमाणे कॅडेट्स च्या मुलाखती इ. उपक्रमात सहभाग घेतला. या कॅडेट्स ची शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय क्षमता चाचणी घेण्यात आली. कॅडेट्स साठी उत्तम भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली होती.
या शिबिरातून व्यक्तिमत्त्व विकसनासाठी सैनिकी शिस्त, राष्ट्रीय संस्कार व पर्यावरण हे गुण रुजविण्याचे प्रयत्न करण्यात आले.

या शिबिराचे उत्कृष्ट आयोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म. यज्ञरामन सर, प्राचार्या ज्योती खिरीड मॅडम, सिनिअर मास्टर श्री. संदीप पवार यांच्या मार्गदर्शनानुसार शिबिर समन्वयक श्री. गजानन पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सैनिकी परिवाराने केले होते.
Camp Shaurya Photo 2026

MES RLMSS – Camp Shaurya – 2026 – II

म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत दि. 2 मे ते 9 मे 2026 या कालावधीत कॅम्प शौर्य – 2 उत्साहात संपन्न झाला.

इ.6 वी ते इ.11 वी च्या एकूण 126 कॅडेट्स ने सैनिकी शाळेच्या साहसी उपक्रमात सहभाग घेतला. आर्टिफिशियल वाॅल क्लांइबिंग’, रिव्हर क्राॅसिंग, स्विमिंग, रायफल शूटिंग, रायडिंग, कराटे, Obstacles, शिवकालीन मर्दानी खेळ, बँड, आपत्ती व्यवस्थापन, बौद्धिक खेळ, कॅम्प फायर, नाईट रुट मार्च, तंबू बांधणे, ड्रिल SSB प्रमाणे कॅडेट्स च्या मुलाखती इ. उपक्रमात सहभाग घेतला. या कॅडेट्स ची शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय क्षमता चाचणी घेण्यात आली. कॅडेट्स साठी उत्तम भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली होती.
या शिबिरातून व्यक्तिमत्त्व विकसनासाठी सैनिकी शिस्त, राष्ट्रीय संस्कार व पर्यावरण हे गुण रुजविण्याचे प्रयत्न करण्यात आले.

या शिबिराचे उत्कृष्ट आयोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म. यज्ञरामन सर, प्राचार्या ज्योती खिरीड मॅडम, सिनिअर मास्टर श्री. संदीप पवार यांच्या मार्गदर्शनानुसार शिबिर समन्वयक श्री. गजानन पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सैनिकी परिवाराने केले होते.
Click the link to catch glimpses of Camp Shaurya 2026 – II
Camp Shaurya Photo 2026

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्वच्छ शाळा, सुंदर शाळा व पर्यावरण पूरक शाळा स्पर्धेत आज आमच्या म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेस सलग दुसर्‍या वर्षी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. रोख रक्कम, सन्मानपत्र व ट्रॉफी, प्रमुख अतिथींच्या हस्ते स्वीकारताना मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड, शाला समिती अध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, महामात्रा प्रा. चित्रा नगरकर, समन्वयक सौ. सावित्री पाटील, लिपिक निकिता जोरी, सिनियर मास्टर व पर्यवेक्षक श्री. संदीप पवार….
💐💐💐💐💐💐


संपूर्ण सैनिकी परिवाराचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन…

आज शुक्रवार दिनांक 1 मे 2026 म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात संपन्न झाला.
प्रशालेचे ज्येष्ठ सेवक श्री. विजय चक्रवर्ती, सिनिअर मास्टर श्री. संदीप पवार, माळी कामगार श्री. शंकर ढमाले, श्री. वासुदेव महाले व श्री. संजय पडवळ यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन झाले.
याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक श्री. महेश कोतकर यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाविषयी माहिती सांगितली. सिनिअर मास्टर श्री. संदीप पवार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म. यज्ञरामन, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड यांच्या मार्गदर्शनानुसार परिपाठ विभाग प्रमुख श्री. महेश कोतकर, क्रीडाशिक्षक श्री. महादेव मगर, हवालदार श्री. गजानन माळी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.

Scroll to Top
Skip to content