आज मंगळवार दिनांक 3-11-2026 रोजी आमच्या शाळेच्या इयत्ता नववी अ च्या विद्यार्थिनींनी श्री गणपती देवस्थान ट्रस्ट पिरंगुट येथे भेट दिली. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी या ठिकाणी पूजेची पिंड स्थापन केलेली आहे. प्रशालेचे सीनियर मास्टर्स श्री अद्वैत जगधने सरांनी या मंदिराचा संपूर्ण इतिहास विद्यार्थिनी समोर सांगितला. विद्यार्थिनींनी महादेवाच्या पिंडीची पूजा करून ओंकार मंत्र पठण तसेच शिवगर्जना विद्यार्थिनींनी म्हटली.
या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन AVN विंग कमांडर म यज्ञरामन व प्रशालेच्या प्राचार्य सौ ज्योती खिरीड मॅडम यांनी केले.
तसेच श्री मार्तंड सर, श्री मगर सर, श्रीमती गुरव मॅडम व श्री राम दाइत सर यांनी या सहलीचे आयोजन केले होते.



