आषाढी एकादशी निमित्त प्रशालेत अभंग गायन स्पर्धा…..

आषाढी एकादशी निमित्त म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथे इयत्ता ६ वी ते ११ वी च्या कॅडेट ची वर्गश: अभंग गायन स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे परीक्षण शाळेचे कमांडंट एअर विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन सर, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे व श्री. संदीप पवार, समुपदेशक सौ. श्रेया दिघे यांनी केले. इयत्ता ६ वी ते ११ वी च्या सर्वच वर्गांनी एकापेक्षा एक उत्कृष्ट अभंगांचे सादरीकरण केले, काही शिक्षकांनी ही सुंदर असे अभंग सादर केले, मा. कमांडंट सरांनी स्वतः माझे माहेर पंढरी अभंग गाऊन सर्वांची मने जिंकून घेतली. या प्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. मंजिरी पाटील, सौ. रेखा रायपूरकर व सौ.सावित्री पाटील यांच्या हस्ते एन.सी.सी, विविध परीक्षा व स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या कॅडेटचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या अभंग गायन कार्यक्रमाचे आयोजन स्पर्धा विभाग प्रमुख सौ. वैशाली शिंदे यांनी केले होते.

Scroll to Top
Skip to content