आज दिनांक 19 नोव्हेंबर रोजी राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेमध्ये कऱ्हाडे ब्राह्मण संघ पुणे यांच्या वतीने 166 व्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून तसेच राणी लक्ष्मीबाई यांच्या 198 व्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ साजरा करण्यात आला. याप्रसंगी कऱ्हाडे ब्राह्मण संघ अध्यक्ष व संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
खालील विद्यार्थिनींचा याप्रसंगी गुणगौरव करण्यात आला
1) कॅडेट अनिताकुमारी रामप्रीत महतो.
अथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेमध्ये
कामगिरी
2) कॅडेट जानवी राजेश महारनूर
रायफल शूटिंग राज्यस्तरीय
स्पर्धेमध्ये कामगिरी
3) कॅडेट कृष्णा अमित ढोरे
बॉक्सिंग स्पर्धेमध्ये उत्कृष्ट
कामगिरी
या कार्यक्रमाला प्रशालाचे कमांडंट विंग कमांडर एम. यज्ञरामन, प्राचार्या ज्योती खि्रीड, सिनिअर मास्टर श्री. अद्वैत जगधने, सैन्य व क्रीडा प्रशिक्षक प्रमुख हवालदार गजानन माळी तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व उपस्थित होते.














