खेलो इंडिया अस्मिता रोलबाॅल लीग स्पर्धा…

रोलबाॅल स्टेडियम बाणेर, पुणे येथे भारत सरकारच्या साई उपक्रमाअंतर्गत खेलो इंडिया अस्मिता रोलबाॅल लीग स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या संघाने प्रथमच सहभाग घेत पाचवा क्रमांक पटकाविला. पारितोषिक वितरण समारंभ कबड्डी खेळाच्या पहिल्या अर्जुन पुरस्कार विजेत्या श्रीमती शकुंतला खटावकर, सैनिकी शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर एम. यज्ञरामन, रोलबाॅल खेळाचे जनक व संस्थापक सचिव श्री. राजू दाभाडे यांच्या शुभहस्ते खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आली. रोलबाॅल खेळाचे सर्व कॅडेटस, मार्गदर्शक श्री. विशाल मालपोटे, श्री. विनायक पाटील, मेट्रन श्रीमती कमलताई व स्वातीताई, सर्व पालक यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐 व विशेष आभार आपल्या सैनिकी शाळेचे निवृत्त क्रीडा शिक्षक व रोलबाॅल खेळाचे जनक श्री. राजू दाभाडे सर यांचे…🙏🙏🙏🙏🙏
Thank you sir, 🙏🏼
Additionally
अस्मिता रोल बॉल अंडर-17 लीग स्पर्धेत RLMSS च्या Under-14 संघाने उल्लेखनीय कामगिरी करत 12 पैकी 5 वा क्रमांक पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
स्पर्धेत एकूण 12 बलाढ्य संघांनी सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे, सर्व संघ 17 वर्षे वयोगटातील असतानाही RLMSS च्या 7वी–8वीतील कॅडेट्सनी 10वी–11वीतील प्रतिस्पर्धी खेळाडूंना दिलेली जोरदार टक्कर हा स्पर्धेचा हायलाइट ठरला.
याबद्दल आयोजकांकडून कॅडेट्स स्पर्धेचे प्रमाणपत्र व विशेष भेट वस्तू देऊन गौरवण्यात आले.

Scroll to Top
Skip to content