दिनांक ३ जुलै २०२३ रोजी शालेय परिपाठात गुरुपौर्णिमा साजरी केली. प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री. अद्वैत जगधने यांनी विद्यार्थिनींना गुरुपौर्णिमेचे महात्म्य पटवून दिले. विद्यार्थिनींनी प्रशालेतील सर्व शिक्षकांना स्वतः तयार केलेले बुकमार्क भेट दिले. कार्यक्रमाचे सर्व संचालन विद्यार्थिनींनीच केले होते. या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे, कॅम्पस डिरेक्टर सौ. गीतांजली बोधनकर यांनी देखील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, श्री.संदीप पवार आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.

