विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण, राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर, पुणे जिल्हा परिषद, शिक्षण विभाग व फ्लोरा इन्स्टिटयूट खोपी तालुका भोर यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष 2023-24 व 2024-25 मध्ये निवड झालेल्या अवॉर्डपात्र विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय INSPIRE award MANAK प्रदर्शनाचे आयोजन दिनांक 13 ते 15 नोव्हेंबर रोजी फ्लोरा इन्स्टिटयूट खोपी, तालुका भोर जिल्हा पुणे येथे करण्यात आले होते.
या प्रदर्शनासाठी प्रशालेतील 2023-24 मधील इयत्ता 9 वी ची विद्यार्थिनी कॅडेट गीता गणपत धनवडे व 2024-25 मध्ये निवड झालेली इयत्ता 8 वी तील कॅडेट देविका सुहास ताड या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता. या योजने अंतर्गत प्रकल्पनिर्मिती साठी प्रत्येक अवॉर्डीला रू.10,000 विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार यांच्यामार्फत देण्यात येतात.
जिल्हास्तरीय प्रदर्शनात सहभागी झालेल्या एकूण 390 प्रकल्पांपैकी कॅडेट देविका ताड ने सादर केलेल्या
Smart, innovative, easy to operate automated official stamp machine तसेच कॅडेट गीता धनवडे ने सादर केलेल्या
An innovative device for carrying pregnant women, elderly
people & patients from remote areas to hospital या दोन्हीही प्रकल्पांची निवड राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी झाली आहे.
पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी शास्त्रज्ञ व रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ पंडित विद्यासागर, नॅशनल इंनोव्हेशन फाउंडेशन चे प्रतिनिधी डॉ भास्कर, उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद पुणे, फ्लोरा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष डॉ पडळकर, पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री रोहिदास एकाड आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रकल्पांसाठी प्रशालेतील ATL विभागप्रमुख सौ. मंजिरी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी प्रशालेच्या शाला समिती अध्यक्षा मा. सौ आनंदीपाटील, महामात्रा मा प्रा चित्रा नगरकर, महामात्र डॉ उमेश बिबवे, सर्व सदस्य, कमांडंट ए वि एन विंग कमांडर मा. एम यज्ञरामन, मुख्याध्यापिका मा. सौ. ज्योती खिरीड व सिनिअर मास्टर श्री संदीप पवार यांनी कॅडेट्सचे अभिनंदन व कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.










