आज दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या तालुकास्तरीय शालेय अँथलेटिक्स स्पर्धेमध्ये म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या कॅडेटने उज्ज्वल यश मिळविले. वयोगट 14, 17 व 19 मुली एकूण सहभागी कॅडेट – 54, पैकी Gold – 30, Silver – 12 व Bronze – 12 असे एकूण 54 मेडल मिळाले. सर्व विजयी व सहभागी खेळाडूंचे, क्रीडा प्रशिक्षक श्री. मंगेश भालेराव, सैन्य प्रशिक्षक श्री. अक्षय मांडगे, क्रीडा प्रशिक्षक रागिणी गंगावणे, मेट्रन भाग्यश्री ताई, ड्रायव्हर श्री. राम काका यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…

