शुक्रवार दिनांक-17/04/26 रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत परसबागेचे उदघाट्न उत्साहात संपन्न झाले.
अनेक वर्षांपासून आपल्या प्रशालेमध्ये सेंद्रिय पद्धतीने विविध प्रकारचा भाजीपाला घेण्यात येतो. यासाठी छोटे-छोटे प्लॉट तयार करून फळ झाडे, वेलवर्गीय भाजीपाला, कोथिंबीर, पालक, मेथी, मुळा, शेवगा अशा अनेक प्रकारचा भाजीपाला घेण्यात येतो. हे काम प्रशालेच्या विद्यार्थिनी ग्रीन क्लब च्या माध्यमातून परसबागेचे काम आनंदाने करतात व आलेला भाजीपाला मेस मध्ये देण्यात येतो. विद्यार्थिनीमध्ये जैविक शेती ची माहिती व्हावी ह्या मागचा उद्देश आहे. परसबागचे उद्घाटन शालासमितीच्या अध्यक्षा सौ. आनंदी ताई पाटील, महामात्रा सौ चित्रा नगरकर, सैनिकी शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म. यज्ञरामन, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड, सौ. वर्षा न्यायाधीश व सिनिअर मास्टर व पर्यवेक्षक श्री. संदीप पवार हे उपस्थित होते.
ह्या उद्घाटन समारंभ चे आयोजन ग्रीन क्लब व पर्यावरण प्रमुख
श्री. भाऊसाहेब मार्तंड
श्री. रविराज थोरात
श्री. समीर जाधव
यांनी पाहिले
ह्या कामासाठी सर्वात मोठे योगदान देणारे माळी कामगार श्री. वासुदेव महाले श्री. संजय पडवळ हे वर्षभर परसबागेचे काम बघत असतात तसेच सर्व सैनिकी परिवाराचे या कामासाठी नेहमीच सहकार्य असते.
🌳🌳🌳🌳🌳🌳
🍀🌻🫛🌶️🧄🧅🍅🫑🌽🥔🥥🍏🍆🌳🌳






















