शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील पहिली पालक सभा रविवार, दिनांक १६ जुलै २०२३ रोजी पार पडली. या पालकसभेत शिक्षक पालक संघाचे पालक प्रतिनिधींची निवड करण्यात आली. तसेच मातापालक संघाचे माता सदस्या देखील निवडण्यात आल्या. प्रशालेतील झालेले उपक्रम, नियोजित उपक्रम, स्पर्धा परीक्षांचे आयोजन, शाळेची नियमावली याबाबत सर्व वर्गशिक्षकांनी पालकांना संबोधित केले तसेच प्रशालेच्या पदाधिऱ्यांनी देखील पालकाना मार्गदर्शन केले.


