RLMSS Bharat Scouts and Guides Unit – Update : 04 Aug 26

मुळशी तालुकास्तरीय एक दिवशीय स्काऊटर गाईडर उजळणी वर्ग संपन्न :- ⚜️🎯
दिनांक 04 ऑगस्ट 2026 पिरंगुट,
पुणे भारत स्काऊट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालय, आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग पुणे, पंचायत समिती शिक्षण विभाग मुळशी व यजमान शाळा पिरंगुट इंग्लिश मीडियम स्कूल पिरंगुट यांच्या संयुक्त विद्यमाने या शैक्षणिक वर्षातील 9वा एक दिवसीय स्काऊटर गाईडर उजळणी वर्ग युनिट नोंदणी शिबिर पिरंगुट इंग्लिश मीडियम स्कूल पिरंगुट येथे संपन्न झाले. सर्वप्रथम सरस्वती पूजन लॉर्ड बेडन पॉवेल आणि माजी उपमुख्यमंत्री कै. अजित दादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वंलनानंतर स्काऊट गाईड प्रार्थना दयाकरदानने उजळणी वर्गाची सुरुवात झाली.
सदर उजळणी वर्गाचे उद्घाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी तथा सहाय्यक जिल्हा आयुक्त स्काऊट माननीय श्री संग्राम पाटील तर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य मा. श्री ज्ञानेश्वर कुंभार हे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघटक स्काऊट श्री दिगंबर करंडे, विषय तज्ञ पंचायत समिती मुळशी तथा स्काऊट गाईड समन्वयक श्रीमती योगिता बालाक्षे, श्रीमती मीनाक्षी खाडे, सहाय्यक जिल्हा आयुक्त स्काऊट श्री विजयकुमार जोरी इत्यादींची उपस्थिती होती.
यावेळी उद्घाटक शिक्षण विस्तार अधिकारी मा. संग्राम पाटील साहेब यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी स्काऊट शिक्षण महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करावे व या शिक्षणाचा शाळेतल्या दैनंदिन व्यवहारात सुद्धा फरक दिसावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे मत व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे प्राचाय श्री कुंभार सर यांनी आजच्या काळात स्काऊट गाईड शिक्षणा चे फायदे सांगून उपस्थित स्काऊटर, गाईडर यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मागील शैक्षणिक वर्षात पिरंगुट इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना स्तरावरील सर्वोच्च राज्यस्तरीय स्काऊट गाईड पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सहा स्काऊट व दहा गाईड यांचा मान्यवराच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
सहाय्यक जिल्हा आयुक्त स्काऊट श्री विजयकुमार जोरी यांनी अभ्यासक्रमाची उजळणी घेतली. वार्षिक नियोजन व अभ्यासक्रमावर सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी उजळणी वर्गाचे प्रस्ताविक जिल्हा संघटक स्काऊट दिगंबर करंडे यांनी केले. त्यांनी वर्षभरातील कार्यक्रम व उपक्रमाचा आढावा सादर केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाईड कॅप्टन श्रीमती सुपेकर पी.यू. यांनी केले.
सदर उजळणी वर्गास मुळशी तालुक्यातील सर्व आस्थापणेच्या शाळेतील स्काऊट गाईडर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर उजळणी वर्ग यशस्वी करण्यासाठी विनोद उमाप, विद्यालयाचे गाईडर पुनम देशमुख व पुरस्कार प्राप्त स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
शेवटी आभार प्रदर्शन गाईडर पूनम देशमुख यांनी केले. उजळणी वर्गाची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने करण्यात आली.
म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतील गाईड कॅप्टन श्रीमती प्रियंका गुरव व शिक्षक श्री प्रभात गुंड यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला होता…















