म.ए.सो. कलावर्धिनी अंतर्गत शालेय ‘रंगवेध’ भेट…

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी एक दीर्घ परंपरा असणारी संस्था आहे. अनेक उपक्रम हे संस्थेचे वैशिष्ट्ये आणि त्या पैकी एक उपक्रम म्हणजे म.ए.सो. कलावर्धिनी अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रांना मिळणारे व्यासपीठ ‘रंगवेध’ होय. पुढील वर्षी हा उपक्रम म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथे आयोजित होणार असल्याचे जाहीर झाले. त्याच्या पूर्व तयारीसाठी शाळचे कमांडंट एम यज्ञरामन, मुख्याध्यापिका पूजा जोग, अद्वैत जगधने, रविराज थोरात व श्वेताराणी साळुंखे यांनी शिरवळ येथील म.ए.सो. इंग्लिश मिडीयम स्कूल येथे भेट देऊन, येथे झालेल्या रंगवेध कार्यक्रमाचे आकलन केले. यातील बारकावे शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती जोशी मॅडम यांनी सांगितले. भविष्यातील रंगवेध उपक्रमाचे आयोजन करण्यासाठी ही भेट महत्त्वाची ठरली.
याप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी करियर बाबत मार्गदर्शन केले गेले, तसेच शालेय बँड पथकाचे प्रात्यक्षिक देखील सादर झाले.

Scroll to Top
Skip to content