राज्यस्तरीय INSPIRE award MANAK 2024 -25 मध्ये म ए सो राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेची यशस्वी कामगिरी

*** – राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड – ***

विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई, राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर, भंडारा जिल्हा परिषद, शिक्षण विभाग व SGB डिफेन्स सर्विसेस अकॅडेमी, शहापूर, जिल्हा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष 2023-24 व 2024-25 मध्ये राज्यस्तरासाठी निवड झालेल्या अवॉर्डपात्र विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय INSPIRE award MANAK प्रदर्शनाचे आयोजन दिनांक 27 ते 29 नोव्हेंबर रोजी SGB डिफेन्स सर्विसेस अकॅडेमी, शहापूर, जिल्हा भंडारा येथे करण्यात आले होते.
या प्रदर्शनासाठी प्रशालेतील 2023-24 मधील इयत्ता 9 वी ची विद्यार्थिनी कॅडेट गीता गणपत धनवडे व 2024-25 मध्ये निवड झालेली इयत्ता 8 वी तील कॅडेट देविका सुहास ताड या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता.
राज्यस्तरीय प्रदर्शनात सहभागी झालेल्या वर्ष 2024-25 मधील एकूण 214 प्रकल्पांपैकी कॅडेट देविका ताड ने सादर केलेल्या
प्रकल्पाची निवड राष्ट्रीय प्रदर्शनासाठी झाली आहे.
राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन साधारण डिसेंबर /जानेवारी महिन्यात दिल्ली येथे संपन्न होणार आहे.
समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी राज्य विज्ञान संस्थेचे संचालक डॉ राजेंद्रकुमार अवसरे, राज्य विज्ञान संस्थेच्या वरिष्ठ अधिव्याख्यात्या डॉ नीतू गोवंडे, डॉ हेमलता बांबल, नॅशनल इंनोव्हेशन फाउंडेशन चे प्रतिनिधी डॉ सुनील भास्कर, डॉ संध्या तिवारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी माध्यमिक सौ मनिषा गजभिये डिफेन्स सर्विसेस अकॅडेमीचे संस्थापक प्राचार्य नरेंद्र पालांदूरकर, इन्स्पायर अवॉर्ड राज्य समन्वयक श्री भास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रकल्पांसाठी प्रशालेतील ATL विभागप्रमुख व विज्ञान अध्यापिका सौ. मंजिरी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी प्रशालेच्या शाला समिती अध्यक्षा सौ आनंदी पाटील, महामात्रा प्रा. चित्रा नगरकर, महामात्र डॉ. उमेश बिबवे, शाला समिती सदस्य श्री विजय भालेराव व श्री सुधीर भोसले, शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर एम यज्ञरामन, मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड व सिनिअर मास्टर व पर्यवेक्षक श्री. संदीप पवार तसेच सर्व सैनिकी परिवार यांनी कॅडेट्सचे अभिनंदन व कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Scroll to Top
Skip to content