रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ यांच्या वतीने प्रशालेस ३ डिजिटल स्मार्ट बोर्ड पॅनेल प्रदान
शनिवार दिनांक १४ जून २०२४ रोजी सैनिकी शाळेत रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ यांजतर्फे ३ मोठ्या आकाराचे अद्ययावत डिजिटल स्मार्ट बोर्ड पॅनेल प्रदान करण्यात आले. शाळेतील मुलींच्या शिक्षणात आधुनिक पद्धतीने अध्ययन अध्यापन व्हावे यामागचा उद्देश आहे. याप्रसंगी प्रशालेत एक छोटेखानी कार्यक्रम करण्यात आला. रोटेरियन डॉ. श्री. मंदार अंबिके (प्रेसिडेंट, रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ) हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रोटेरियन CSR Head विनोदभाई आगरवाल यांनी विशेष प्रयत्न केले होते. म.ए.सो. संस्थेतून आजीव सदस्य मंडळाच्या श्रीमती नेहा देशपांडे आवर्जून उपस्थित होत्या. याप्रसंगी first lady श्रीमती प्रिया अंबिके, director Rtn. डॉ. विजया गुजराथी, Rtn. श्रीमती मनिषा बेलगावकर, Rtn श्री. राजेश बेलगावकर, Rtn. श्री. सुभाष करंदीकर, Rtn. श्रीमती श्वेता करंदीकर, Rtn. श्री. संदीप अवधानी, Rtn. श्रीमती शुभदा अवधानी, Rtn. श्री. विनायक जोशी, Rtn. श्रीमती रेखा जोशी उपस्थित होते. पुढील काळात प्रशालेच्या गरजा लक्षात घेऊन मदत करण्याचे मान्य करण्यात आले. प्रशालेचे कमांडंट श्री. एम यज्ञरमण, प्राचार्या पूजा जोग, संपूर्ण सैनिकी परिवारातील घटक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सिनियर मास्टर श्री श्याम नांगरे यांनी केले.


















