महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा. आपली शाळा नेहमीच विविध कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने साजरे करण्यात अग्रेसर असते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे या वर्षी स्नेहसंमेलनाचा विषय शिव-वंदना असा होता. स्नेहसंमेलन दिनांक २२ डिसेंबर रोजी संध्या. ४ ते ७ या वेळेत शालेय क्रीडांगणावर संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रशालेची माजी विद्यार्थिनी मा. संतोषी जालिंदर थोरात (सहा. अभि. जलसंपदा विभाग महा. राज्य) या लाभल्या होत्या तर म.ए.सो. नियामक मंडळ उपाध्यक्ष व प्रशालेच्या शालासमिती अध्यक्षा मा. आनंदीताई पाटील ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
NINAD Flex-1
Ninad Invitation 2023-1
22 Dec 2023










या प्रसंगी विविध गुणदर्शन कार्यक्रमात शिवाजी महाराजांना गाणं-स्वरुप वंदन सादर करण्यात आले. विविध प्रकारे प्रशालेस मदत करणाऱ्या दात्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. प्रशालेची Endowment prizes प्रदान करण्यात आली. सदर कार्यक्रमात महाराष्ट्र दैवत छत्रपती शिवरायांच्या शिवराज्यभिषेकाला यंदा ३५० वर्ष पूर्ण होत आहेत, या गोष्टींची जाणीव ठेऊन आपल्या cadets नी उत्स्फूर्तपणे महाराजांच्या जीवनावर आधारित नृत्य, नाट्य कार्यक्रम आज सादर केला. महाराज प्रत्येकाच्या मनामनांत कसे आहेत हेच Cadets च्या देहबोलीतून आपण अनुभवले. Cadets ची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन, संस्था तसेच प्रशाला पदाधिकारी मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य यामुळे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.




