
राज्य विज्ञान संस्था, रविनगर, नागपूर व पुणे जिल्हा परिषद (माध्यमिक शिक्षण विभाग) यांच्या सयुंक्त विद्यमाने सोमवार दिनांक १३ ऑगस्ट विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन रावसाहेब पटवर्धन विद्यालय, सिंहगड रोड, पुणे यांच्या तर्फे करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील १४ तालुक्यातील संघांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये म. ए. सो. राणी लक्ष्मिबाई मुलींची सैनिकी शाळेच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. ‘स्वस्थ व स्वच्छ भारत’ संकल्पनेवर आधारित ‘कीर्तन आरोग्याचे’ ही नाटिका सादर करण्यात आली. या नाटीकेची निवड विभागस्तरावर करण्यात आली.
नाटिकेचे लेखन व दिग्दर्शन प्रशालेतील अध्यापक श्री. राजेश शिंदे यांनी केले असून, नेपथ्य व मार्गदर्शन विज्ञान विभाग प्रमुख सौ. मंजिरी पाटील यांनी केले. पेटी वादनासाठी श्री. साईनाथ जगदाळे तर तांत्रिक बाबतीत श्री. रविराज थोरात यांनी साहाय्य केले. विज्ञान अध्यापिका सौ.स्नेहा मुद्गल व सौ. वैशाली शिंदे यांनी मार्गदर्शन व सहाय्य केले. या यशाबद्दल सैनिकी शाळेचे कमांडंट कर्नल श्री. सारंग काशीकर, प्राचार्या सौ. पूजा जोग, शाळेचे व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थिनींचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.
