53 वे मुळशी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2025-26 दिनांक 23 ते 24 डिसेंबर 2025 रोजी न्यू इंग्लिश स्कूल मारुंजी या ठिकाणी संपन्न झाले. सदर प्रदर्शनामध्ये प्रश्नमंजुषा, वकृत्व स्पर्धा व प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे
प्रश्नमंजुषा स्पर्धा:
लहान गट:
1) कॅडेट अपूर्वा अक्षय देशपांडे – इ. 8 वी
2) कॅडेट कशिश बिपीन वाले इ. 8 वी
मोठा गट:
1) कॅडेट इंद्रजा योगेश भोसले – इ. 11 वी
2) कॅडेट प्रशंसा अरविंद वानखेडे – इ. 11 वी
प्रश्नमंजुषा लहान गटासाठी सौ. मंजिरी पाटील व मोठा गटासाठी सौ. सावित्री पाटील यांनी मार्गदर्शन केले.
वक्तृत्व स्पर्धा:
लहान गट:
1) कॅडेट श्रुतिका संतोष घिवारे- इ. 7 वी विषय : भारत व आधुनिक शेती
मोठा गट:
1) कॅडेट अपूर्वा चंद्रकांत केंजळे – इ.11 वी A विषय : जागतिक तापमानवाढ आणि आपली जबाबदारी
वकृत्व स्पर्धा लहान गट यासाठी सौ. वैशाली शिंदे व मोठा गट यासाठी श्री. प्रमोद झुरमुरे व श्री. शिवदास कापुरे यांनी मार्गदर्शन केले.
प्रकल्प:
लहान गट: 1) कॅडेट स्वरा योगेश केदारी – इ. 8 वी Smart innovation for health and hygiene safety product
मोठा गट:1) कॅडेट गायत्री गिरीश रसाळ – इ.9 वी Smart street light to prevent accident in ghat area
लहान गटातील प्रकल्पासाठी सौ. प्रियांका हजारे घोडके व श्री रविंद्र उराडे व मोठ्या गटासाठी कु. संस्कृती मंगावडे व श्री. मंगेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.
तालुकास्तरावर कॅडेट्सला उत्तम असे यश मिळाले. वकृत्व स्पर्धा लहान गटांमध्ये कॅडेट श्रुतिका संतोष घेवारे या कॅडेटला प्रथम क्रमांक मिळाला, प्रश्नमंजुषा मोठा गट यांचा द्वितीय क्रमांक आला. तर लहान गटातील प्रकल्पाचा तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक येऊन या प्रकल्पाची जिल्हास्तरासाठी निवड झाली.
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक 8 ते 10 जानेवारी 2026 रोजी रायसोनी इंजिनीअरिंग कॉलेज वाघोली पुणे येथे संपन्न झाले. लहान गटातील प्रकल्प कॅडेट स्वरा योगेश केदारी व तिला मार्गदर्शन करणाऱ्या सौ. प्रियांका हजारे घोडके व श्री. रविंद्र उराडे यांनी जिल्हास्तरासाठी तिला मार्गदर्शन केले. सर्व विज्ञान शिक्षकांनी यासाठी विशेष प्रयत्न घेतले. शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर यज्ञरामन, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड, सिनियर मास्टर श्री. संदीप पवार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.













