या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
शक्तीची आराधना, उपासना हे नवरात्रीचे महत्त्व, म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा ही देखील गेली दोन दशके शक्तीची उपासना करत आहे. आपल्यातील देवत्वाची, शक्तीची जाणीव व्हावी व सक्षम महिला देशाला मिळावी या उद्देशाने कार्य करणाऱ्या म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत पहिल्यांदाच नवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. यज्ञरामन सर व प्राचार्या सौ. ज्योती खिरीड मॅडम यांच्या प्रेरणेतून उत्सवाची सुरुवात झाली. सिनियर मास्टर संदीप पवार सर यांच्या नित्यपूजेची सेवा, श्री. महेश शिंदे यांची आरती व संबळ सेवा यामुळे सात्विक वातावरणात नऊ दिवस देवीची आरती व आराधना करण्यात आली. शाळेतील कॅडेट ने देवीच्या नऊ रूपांचे महत्त्व सांगितले. या देवी कार्यासाठी कर्मचारी वर्गाने आपला आर्थिक सहयोग दिल्याने उत्सव यशस्वी झाला. देवीची मूर्ती इयत्ता १० वी अ मधील पालक श्री. हेमंत चव्हाण यांनी शाळेस भेट दिली. वसतिगृह विभाग श्रीमती प्रियांका गुरव मॅडम व त्याच्या सहकारी यांनी नियमित पूजेची तयारी केली. सुभेदार श्री. नवनाथ पवार सर व श्री. भाऊसाहेब मार्तंड सर यांच्या मेस विभागाने रोजचा नैवेद्य व प्रसाद अर्पण केला. सर्व कॅडेटस साठी भोंडला व सर्व महिला शिक्षकांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन वसतीगृह विभागाने केले होते. या प्रसंगी सर्वांनी देवीची आरती करण्याचा लाभ घेतला. श्री अद्वैत जगधने व शाळेतील छंद वर्गाने ह्या उत्सवाचे आयोजन केले. कोजागिरी पौर्णिमेला देवीची उत्सव समापनाची आरती व रात्री दुग्धपान होऊन शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता केली गेली. आई जगदंबेच्या आशिर्वादाने ही उत्सव परंपरा अखंडित राहो.















