सैनिकी प्रशालेत ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा…

गुरुवार, दिनांक 26 नोव्हेंबर 2026 रोजी म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. यज्ञरामन, प्राचार्य सौ. ज्योती खिरीड, सीनियर मास्टर श्री. अद्वैत जगधने यांच्या हस्ते सरस्वती व संविधान पूजन करण्यात आले.
प्रशालेच्या शिक्षिका सौ. प्रीतपर्णा दास व शिक्षक श्री. प्रभात गुंड यांनी भारतीय संविधान याविषयी विद्यार्थिनींना माहिती व संविधानाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर प्रशालेच्या प्राचार्या सौ. ज्योती खिरीड मॅडम यांनी विद्यार्थिनींना संविधानाचा आदर व अभिमान बाळगावा असे सांगितले.
‘संविधान दिन’ निमित्त प्रशालेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
* संविधान उद्देशिकेचे सर्व अधिकारी, शिक्षक व विद्यार्थिनींनी सामूहिक वाचन केले.
* संविधान जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली.
* संविधान विषयक चित्रकला व पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आली.
* संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली.
* संविधान दिनाचे औचित्य साधून संविधानावर आधारित लहान प्रश्नावली विद्यार्थिनींकडून सोडवून घेण्यात आली.
विद्यार्थिनींमध्ये लोकशाही प्रक्रियेबद्दल आदर विकसित करणे आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजविणे या दृष्टीने उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता सहावी ते अकरावीच्या विद्यार्थिनींनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. वरील कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रशालेतील इतिहास विभागातील सर्व शिक्षकवृंद यांनी केले होते.

Scroll to Top
Skip to content