मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथे इयत्ता बारावीची पासिंग आऊट परेड उत्साहात संपन्न झाली. इयत्ता बारावीच्या कॅडेटसनी शानदार संचलन करीत प्रमुख अतिथींना मानवंदना देत अंतिम पग पार केले. अॅकॅडमिक कॅडेट कॅप्टन शैजल राकेश पाटील हिने पासिंग आऊट परेड चे नेतृत्व केले. सैनिकी शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच इ.12 वी च्या कॅडेटस नी शानदार असे सशस्त्र संचलन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून कर्नल पंकज करवंदे (निवृत्त), सौ. मंजुषा करवंदे, मएसो कलावर्धिनी महामात्र व रंगवेध 2026 चे समन्वयक डाॅ. गोविंद कुलकर्णी, सैनिकी शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म. यज्ञरामन, सिनिअर मास्टर व पर्यवेक्षक संदीप पवार हे उपस्थित होते. आपल्या मनोगतात कर्नल पंकज करवंदे यांनी सांगितले की देशाच्या संरक्षण व्यवस्थेत महिलांसाठी अनेक संधी निर्माण होत आहेत त्या दृष्टीने सर्वच कॅडेटसनी आपली शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमता वाढविली पाहिजे असे सांगितले. याप्रसंगी सैनिकी शाळेची मानाची असलेली तलवार “बेस्ट स्वार्ड ऑफ ऑनर” चा बहुमान अॅकॅडमिक कॅडेट कॅप्टन शैजल राकेश पाटील हिला मिळाला, तर बेस्ट इन अॅकॅडमिक्स ट्रॉफी अॅकॅडमी अॅडज्युटंट कॅडेट भक्ती तानाजी मोरे, बेस्ट इन आऊट डोअर ट्रेनिंग ट्रॉफी स्पोर्ट्स व्हाइस कॅप्टन कॅडेट रिद्धी रोहित पासलकर यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे एन सी सी च्या द्वितीय वर्षातील उत्तम प्रदर्शन करणाऱ्या कॅडेट्सना ट्रॉफीज देऊन गौरविण्यात आले. यामध्ये ‘बेस्ट इन टर्नआउट’ हा पुरस्कार LFC लावण्या शिवकुमार मुंडासे, ‘बेस्ट इन ड्रिल’ हा पुरस्कार Cpl कृष्णा अमित ढोरे आणि ‘बेस्ट कॅडेट ऑफ २०२४-२५’ हा पुरस्कार LFC देविका सुहास ताड यांना पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आला.
या पासिंग आऊट परेड कार्यक्रमाचे आयोजन हवालदार गजानन माळी, सुभेदार नवनाथ पवार, क्रीडा शिक्षक महादेव मगर, ए एन ओ थर्ड ऑफिसर राजश्री गोफणे, एनसीसी प्रशिक्षक तेजश्री दिघे व कार्तिकी भालेराव, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व सैनिकी परिवाराने केले होते.



























